नारायणगावला साकारणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अन् पूर्ववेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:00+5:302021-03-01T04:11:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : येथील पूर्ववेशीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह पूर्व वेस करण्याचा निर्णय ग्राम बैठकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : येथील पूर्ववेशीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह पूर्व वेस करण्याचा निर्णय ग्राम बैठकीत झाला. या वेळी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दिलेल्या देणगीद्वारे बारा लाख रुपयांचा निधी एकाच दिवसात जमा झाला. संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षण ठरेल अशी सुमारे पस्तीस लाख रुपये खर्चाची वेस बांधण्यात येणार आहे. इतर कोणताही निधी न घेता ग्रामस्थ व संस्थांच्या माध्यमातून ही वेस साकारण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी दिली.
नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत नारायणगावची वेस नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच योगेश पाटे, माजी सरपंच अशोक पाटे, एकनाथ शेटे, संतोष वाजगे, अशोक गांधी, राजेंद्र बोरा, रामभाऊ तोडकरी, ज्ञानेश्वर दळवी, राजाराम पाटे, आशिष माळवतकर, डॉ. संदीप डोळे, महेश शिंदे, संजय वाजगे, मुकेश वाजगे, गणेश वाजगे, विकास तोडकरी, आरिफ आतार, जितेंद्र गुंजाळ, दीपक वारुळे, शिरीष जठार, संजय मुनोत, एम. डी. भुजबळ, राजू पाटे, भागेश्वर डेरे, रमेश मेहेत्रे, रशिद इनामदार, उल्हास दळवी, बाळासाहेब तांबे, ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे, बबन पानसरे, विलास दळवी, रोहिदास तांबे, संतोष दांगट, संतोष पाटे, राजेश बाप्ते, अनिल खैरे, संजय खैरे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ग्रामबैठकीत १९८२ साली बांधण्यात आलेल्या पूर्व वेस ऐवजी नव्याने आणि महाराष्ट्रात आकर्षण ठरेल आणि शिवकालीन अशी पूर्व वेस बाधण्यात येणार आहे. नव्या वेशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल. ही वेस ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प करून शिवजयंतीपूर्वी ही वेस तयार असेल, असा विश्वास सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन आशिष माळवतकर यांनी केले.
फोटो : नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे व उपस्थित ग्रामस्थ. दुसऱ्या छायाचित्रात साकारण्यात येणारी नियोजित पूर्व वेस.