कोरोनातून झाली सुटका, पण म्युकरमायकोसिसने घेतला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:24+5:302021-07-27T04:11:24+5:30

पुणे : कोरोनातून बरे झाले, पण म्युकरमायकोसिसने गाठले, असे पुणे शहरासह जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार २७१ रूग्ण आढळून आले ...

Escaped from the corona, but succumbed to myocardial infarction | कोरोनातून झाली सुटका, पण म्युकरमायकोसिसने घेतला जीव

कोरोनातून झाली सुटका, पण म्युकरमायकोसिसने घेतला जीव

Next

पुणे : कोरोनातून बरे झाले, पण म्युकरमायकोसिसने गाठले, असे पुणे शहरासह जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार २७१ रूग्ण आढळून आले असून, यापैकी १८३ जणांचा मृत्यू झाला आहे़ १५ ते २१ जुलै दरम्यान मात्र केवळ १६ रूग्ण आढळून आले असून, सद्यस्थितीला २९९ रूग्णांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत़

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, म्यूकरमायकोसिसच्या रूग्णांपैकी ससून रूग्णालयात उपचार घेणाºया १८३ जणांचा मृत्यू झाला आह़े तर ग्रामीण भागात ९, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ३५ व पुणे महापालिका हद्दीत ६० जणांचा मृत्यू झाला आहे़

म्यूकरमायकोसिसचे सर्वाधिक रूग्ण एकट्या जून महिन्यात आढळून आले असून ही संख्या ४२६ इतकी आहे़ तर एकूण रूग्णांमध्ये पुणे शहरात ५०४, पिंपरी-चिंचवडमध्ये २८९, पुणे ग्रामीणमध्ये ७१, व ससूनमध्ये उपचारासाठी दाखल असलेले ४०७ रूग्ण आहेत़ दरम्यान या सर्व रूग्णांच्या उपचारासाठी आत्तपर्यंत ५१ हजार ९३३ अ‍ॅम्फोटेरिसीन इंजेक्शनच्या कुप्यांचे वितरण करण्यात आले आहे़ यामध्ये खाजगी रूग्णालयांना २० हजार ८७७, महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी खासगी रुग्णालयांना ९ हजार ७९५ व शासकीय रूग्णालयांना २१ हजार २६१ इंजेक्शनच्या कुप्यांचे वितरण आत्तापर्यंत झाले आहे.

Web Title: Escaped from the corona, but succumbed to myocardial infarction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.