साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:31 PM2019-08-21T14:31:01+5:302019-08-21T14:33:10+5:30

पाेलीसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी पुणे पाेलिसांसाठी निबंध स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.

essay competition for police to improve thir work | साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था

साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था

googlenewsNext

पुणे : शहरात घरफाेड्या, दराेडे, चाेऱ्या, मारहाणीचे गुन्हे वाढले असताना दुसऱ्या बाजूला पाेलीस प्रशासन पाेलिसांमधील सेवा जाणीव वाढावी, यासाठी निबंध स्पर्धा घेण्यावर भर देत आहे. पाेलिसांमधील उत्साहाला आणि कार्यक्षमतेला वाव मिळावा, यासाठी निराळ्या पद्धतीचे पाेलिसिंग करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. मात्र या सगळ्यात वरिष्ठ साेहबांच्या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असणाऱ्या पाेलीस निबंध स्पर्धेमुळ उत्साहाऐवजी अनेकांची डाेकेदुखी वाढली आहे. 

पुणे शहर पाेलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून पुणे शहर पाेलीस दलामध्ये असलेल्या सर्व पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात कर्तव्याप्रति जागरुकता आणि सेवा भावाची जाणीव, उत्साह निर्माण हाेण्याकरीता या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. पाेलीस माझा अभिमान, खाकी माझी शान आणि कर्तव्य दक्षतेतून लाेकांच्या हृद्यात असे विषय निबंध लेखनाकरिता निवडण्यात आले आहेत. याकरिता 30 पाेलीस स्टेशन, गुन्हे शाखेतील 5 युनिट व 1 भराेसा सेल, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक विभागातील पाच परिमंडळ, विशेष शाखा 1 व 2 आणि मुख्यालय यातील एकूण 51 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विविध पाेलीस स्टेशन त्यातील वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, मुख्यालयातील राखीव पाेलीस निरीक्षक आपल्या कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून निबंध लिहून घेतील. 

तसेच पाेलीस स्टेशन, शाखा आणि मुख्यालय स्तरावरील एखादी व्यक्ती परीक्षक म्हणून काम पाहणार असल्याचे पाेलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाेलीस शिपाई ते सहायक पाेलीस आयुक्त यांच्या करिता आयाेजित केली आहे. त्यांनी पाेलीस दलात काम करताना आलेल्या अनुभवांवरुन पत्रकात नमूद केलेल्या एका विषयावर 200 ते 250 शब्दांत आपले सविस्तर मनाेगत स्वहस्ताक्षरात देण्याची अट हाेती. विशेष म्हणजे, बक्षीसपात्र निबंधांचे एक पुस्तक तयार केले जाणार आहे. आयुक्त स्तरावरील बक्षीसपात्र मनाेगत लिहीणारे पाेलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार पाेलीस आयुक्त यांच्या हस्ते हाेणार आहे. 
 
दरम्यान पाेलीस दलातील अनुभव आणि त्यावर आधारित नमूद केल्यापैकी एका विषयावर निबंध लिहिण्यासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांना मात्र मेंदुला चालना द्यावी लागत आहे. दैनंदिन कामातून वेळ काढून दिलेल्या वेळेच निबंधाचे काम पूर्ण करावयाचे आहे. राेज घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करायचा साेडून उत्साह आणि जागृकता निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न पाेलीस कर्मचारी आणि अधिकारी दाेघांनाही त्रासदायक ठरला, परंतु साहेबांचे सांगणे टाळता येईना आणि लिहिण्यास काही सुचेना याची प्रचिती त्यांच्याकडे पाहिल्यावर आली. 

Web Title: essay competition for police to improve thir work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.