ग्रंथांमध्ये दडले जीवनाचे सार

By admin | Published: February 6, 2015 12:30 AM2015-02-06T00:30:07+5:302015-02-06T00:30:07+5:30

ग्रंथांमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. त्याचा प्रसार करीत ज्ञानाचे दान केल्यास मानवता धर्म अधिक समृद्ध होईल आणि विश्वात शांतता प्रस्थापित होईल’’,

The essence of life hidden in the books | ग्रंथांमध्ये दडले जीवनाचे सार

ग्रंथांमध्ये दडले जीवनाचे सार

Next

पुणे : ‘‘ग्रंथांमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. त्याचा प्रसार करीत ज्ञानाचे दान केल्यास मानवता धर्म अधिक समृद्ध होईल आणि विश्वात शांतता प्रस्थापित होईल’’, असे प्रतिपादन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.
डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एमआयटी संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण, बायबल, तुकारामगाथा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या ग्रंथांचा या तुलेमध्ये समावेश होता.
तुला केलेले ग्रंथ एमआयटी समूहातील सर्व संस्थांच्या प्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुखांना देण्यात आले.
या प्रसंगी ऊर्मिला कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, उषा कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, काशीराम कराड, प्रभू घुले, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटीचे कुलसचिव एस.व्ही. कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड, प्रा. राहुल कराड उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

पुढील पिढीने
ज्ञानदान सुरू ठेवावे
४वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची झालेली ग्रंथतुला ही त्यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याची पूजा आहे. या ग्रंथतुलेतील ग्रंथ ज्ञानदीप आहेत. त्यामुळे या ग्रंथांचे सर्वांनी वाचन करून त्यातला मथितार्थ समजून घ्यायला हवा. एमआयटीतील पुढील पिढीने कराड यांचा वारसा पुढे नेत ज्ञानदानाचे कार्य नियमितपणे चालू ठेवावे.

अध्यात्माचा
अर्थ समजला
४प्रा. कराड म्हणाले, ‘‘वडिल भगिनी प्रयागअक्कांनी मला जगण्याची प्रेरणा दिली. अध्यात्माचा खरा अर्थ समजून सांगितला. दुसऱ्यासाठी कायम झीजत राहाण्याची शिकवण मोठ्या भावाने दिली.
४महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, डॉ. सुरेश घैसास, डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे उपाध्यक्ष राहुल कराड, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.

समाजासाठी झिजणे आनंददायी
४धार्मिक वृत्तीचा आणि अंधश्रद्धा जोपासणारा देश अशी भारताची प्रतिमा पाश्चिमात्य देशांनी केल्याची खंत माझ्या मनात आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा संगम करण्याचा माझा प्रयत्न आहे. एका जागी बसून गंजण्यापेक्षा समाजासाठी कार्य करीत झिजणे अधिक आनंददायी आहे. त्यामुळे भविष्यातही मी जिद्दीने काम करीत राहणार आहे, अशी कृतज्ञापूर्वक भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली.
४एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळींतर्फे कराड यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

Web Title: The essence of life hidden in the books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.