'विघ्नहर'कडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:07+5:302021-08-01T04:10:07+5:30
सत्यशिल शेरकर म्हणाले की, कोराेनापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्या सॅनिटायझरचे उत्पादन करुन त्याचे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाटप ...
सत्यशिल शेरकर म्हणाले की, कोराेनापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्या सॅनिटायझरचे उत्पादन करुन त्याचे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोवीड सेंटरला मोठ्या प्रमाणात मदत म्हणून सुमारे २०० बेडस व पीपीई किट उपलब्ध करुन देऊन नागरीकांचे कोरोना संसर्गापासून दिलासा मिळवून दिला. त्याचबरोबर विघ्नहर कारखान्याचे सर्व कामगार व अधिकारी यांच्या एकदिवसाच्या पगाराची सुमारे ७ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडे सुपूर्द करुन कोवीडगस्त नागरीकांना सहाय्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर यंदा पावसामुळे महापूर येवून बाधीत झालेल्या नागरीकांसाठी अन्नधान्य, किराणामाल व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या. याप्रसंगी चेअरमन सत्यशिल शेरकर,व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
३१ नारायणगाव
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवताना उपस्थित असलेले सत्यशिल शेरकर, अशोक घोलप व इतर.