अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:57+5:302021-04-21T04:11:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याने व वारंवार निर्बंध वाढवूनही शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी ...

Essential service shops are now open only from 7 to 11 in the morning | अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडी

अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याने व वारंवार निर्बंध वाढवूनही शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी होत नसल्याने अखेर प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे़ अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहेत़ पुणे महापालिकेनेही नवीन आदेश काढले असून १ मेपर्यंत लागू होणार आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत़ ज्या अत्यावश्यक सेवांना पुणे महापालिका हद्दीत सकाळी ७ ते ११ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे़ त्यामध्ये किराणा, भाजीपाला, फळविक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीच्या दुकानांसह) यांना परवानगी देण्यात आहे़

कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा), पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक व संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने यांचाही यात समावेश राहणार आहे़ मात्र या दुकानांतून घरपोच पार्सल सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे़

----------------

Web Title: Essential service shops are now open only from 7 to 11 in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.