इंदापूरात पन्नास ऑक्सिजनबेडचे कोवीड सेंटर उभा करापलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:34+5:302021-04-04T04:11:34+5:30

भिगवण येथे भव्य ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. अद्याप ट्रॉमा केअर सेंटर सुरु न झाल्यामुळे गतवर्षी या ...

Establish a coveted center of fifty oxygen beds at Indapur | इंदापूरात पन्नास ऑक्सिजनबेडचे कोवीड सेंटर उभा करापलब्ध करा

इंदापूरात पन्नास ऑक्सिजनबेडचे कोवीड सेंटर उभा करापलब्ध करा

Next

भिगवण येथे भव्य ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. अद्याप ट्रॉमा केअर सेंटर सुरु न झाल्यामुळे गतवर्षी या इमारतीमध्ये पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. यावेळी सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आजच्या घडीला इंदापुर तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. तालुक्यातील कोविड सेंटर जवळपास हाऊसफुल्ल झाली असून भिगवण येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील रुग्नांना उपचारासाठी बारामती व इतरत्र जावे लागते आहे. रुग्णांना आर्थिक ताणांसह मोठा त्रासही सहन करावा लागत आहे.

कोविड सेंटरमध्ये स्वच्छता राखण्यात यावी, तसेच येथे पन्नास ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्या मांडल्या गेल्या. या ठिकाणी ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध झाल्यास इंदापुर तालुक्यातील कोविड रुग्नांना त्याचा फायदा होईल. भिगवण ग्रामपंचायत व इंदापूर पंचायत समितीच्या मागणीनुसार इंदापुरचे प्रभारी तहसिलदार यांनी नुकतीच कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे.

याबाबत राज्याचे भाजपा नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील म्हणाले, इंदापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणार अपघात व या भागाची गरज विचारात घेऊन आपण भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरला मंजुर केले होते. सध्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु आहे. रुग्नांची गरज विचारात घेऊन या ठिकाणी पन्नास ऑक्सिजन बेडची उपलब्धता करुन द्यावी यासाठी पाठपुरावा करत आहे. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, येथील भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,कपिल भाकरे

Web Title: Establish a coveted center of fifty oxygen beds at Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.