लोककलावंत आर्थिक विकास मंडळाची स्थापना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:17+5:302021-09-27T04:12:17+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील आर्थिक घडी कोलमडली आहे. याला कलावंतदेखील अपवाद नाही. तेव्हा वाघ्या मुरळी, गोंधळी, जागरण गोंधळ लोकलावंत, ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील आर्थिक घडी कोलमडली आहे. याला कलावंतदेखील अपवाद नाही. तेव्हा वाघ्या मुरळी, गोंधळी, जागरण गोंधळ लोकलावंत, लोकनाट्य कला मंडळ या वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील चाळीस वर्षे वयाच्या पुढील कलावंतांना मानधन देण्यात यावे, तसेच वाघ्या मुरळी, गोंधळी अशा कलावंतांना शासन दरबारी कलावंत म्हणून मान्यता द्यावी, कलावंतांच्या मुला-मुलींचा शैक्षणिक खर्च शासनाने उचलावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर प्रवीण गरुडकर, मल्हारी धुमाळ, सुनील जाधव, कानिफनाथ अटक, अशोक गरुडकर, हनुमंत आडागळे, महेश धुमाळ, विजय पाचंगे, तानाजी जाधव , संजय पाचंगे, जयश्री बारूंगळे, आशा सोनवणे, काजल देशमुख, प्रसाद गरुडकर, विशाल गरुडकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत. वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी शिष्टमंडळ शासनदरबारी सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन कलावंतांच्या व्यथा मांडणार असल्याचे वाघ्या मुरळी परिषदेचे दौंड तालुका अध्यक्ष प्रवीण गरुडकर यांनी सांगितले.