माळवाडी येथे कृषी सल्ला केंद्राची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:06+5:302021-07-09T04:08:06+5:30

बारामती तालुक्यातील माळवाडी गावात महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अकलूज ...

Establishment of Agricultural Advisory Center at Malwadi | माळवाडी येथे कृषी सल्ला केंद्राची स्थापना

माळवाडी येथे कृषी सल्ला केंद्राची स्थापना

Next

बारामती तालुक्यातील माळवाडी गावात महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्य अनुभवासाठी आलेल्या कृषिदूतांचे ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. सध्या यांत्रिकी युग आले आहे. याचा उपयोग करून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत कृषिदूत अभिजित बोरकर यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग मोहिते, डॉ. डी. पी. कोरडकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्राचार्य एस. एम. एकतपुरे, एस. आर. आडत, बी. एम. मेटकरी तसेच उपसरपंच अनिल लडकत, मुरलीधर लोणकर, कुसूम लोणकर, शुभांगी बारवकर, माया लोणकर, करिष्मा लोणकर, लक्ष्मीबाई लोणकर, ओम बोरावके, श्रेयस बारवकर, दादासो लोणकर सूत्रसंचालन केले, आभार मुरलीधर लोणकर यांनी केले.

माळवाडी कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन करताना कृषिदूत व सरपंच.

०८०७२०२१-बारामती-०५

Web Title: Establishment of Agricultural Advisory Center at Malwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.