रिटेल व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी असोसिएशनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:04+5:302021-09-12T04:15:04+5:30
‘URTGA’ उद्दिष्टाविषयी राजेश शेवानी, मिलिंद शालगर, दादा गुजर, दीपक पारवानी, सुरेंद्र जैन, माधव गोडबोले या संस्थापकांनी माहिती दिली. म्हणाले, ...
‘URTGA’ उद्दिष्टाविषयी राजेश शेवानी, मिलिंद शालगर, दादा गुजर, दीपक पारवानी, सुरेंद्र जैन, माधव गोडबोले या संस्थापकांनी माहिती दिली.
म्हणाले, ‘‘रिटेल व्यापारी संघटित करून त्यांचे प्रश्न सरकार दरबारी सोडवणूक करणे, रिटेल व्यापारी यांच्या संदर्भातील कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदींची माहिती व्यापारी वर्गाला देणे, रिटेल व्यापाराला प्रोत्साहन मिळेल अशा योजना राबवणे, सरकारकडून व्यापाऱ्यांसाठी मिळणाऱ्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोचवणे, रिटेल व्यापारी वर्गांचे एकमेकांशी संबंध दृढ करण्यासाठी मेळावे घेणे, रिटेल व्यापारांकडून समाजासाठी विविध सामाजिक कार्यक्रम राबवणे, रिटेल व्यापारांची एकंदरीत गुणवत्ता वाढवणे, रिटेल व्यापारासाठी कुशल कामगार उपलब्ध करून देणे, आदी गोष्टींवर असोसिएशन काम करणार आहे. (वा.प्र.)
---------------------------------------------------
( URTGA’चा लोगो अनावरण करताना (उजवीकडून) दीपक पारवानी, राजेश शेवानी, मिलिंद शालगर, डायाभाई शहा, दादा गुजर, सुरेंद्र जैन, माधव गोडबोले.)