दिव्यांग क्रिकेट काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:53+5:302021-07-09T04:08:53+5:30
भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार रमेश सरतापे, विश्वचषक विजेचे माजी कर्णधार विवेक मालशे यांची संयुक्त सचिव पदावर निवड झाली ...
भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार रमेश सरतापे, विश्वचषक विजेचे माजी कर्णधार विवेक मालशे यांची संयुक्त सचिव पदावर निवड झाली आहे. तर दिव्यांग क्रिकेट कर्णधार शाहिद अन्सारी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी बीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करीत डीसीसीआयची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्थापना अखिल भारतीय नोंदणीकृत नॅशनल असोसिएशन/फेडरेशनद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. डीसीसीआयकडून सर्व दिव्यांग खेळाडूंच्या प्रगतीसाठी, त्यांना क्रिकेटच्या सुविधा उपलब्ध करून देणे, निवृत्त खेळाडूंना पेन्शन योजना सुरू करणे या योजना राबवण्यात येणार आहे.
फोटो- काश्मीर सिंग, विवेक मालशे