जेजुरी गडावर गणरायाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:50+5:302021-09-11T04:12:50+5:30
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर मंगलमय व धार्मिक वातावरणात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोना ...
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर मंगलमय व धार्मिक वातावरणात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोना महामारीचा नायनाट होऊ दे, भाविकभक्तांना मंदिरे पुन्हा सुरू होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विश्वस्त शिवराज झगडे, देवसंस्थान पर्यवेक्षक गणेश डिखळे, संतोष खोमणे, ज्येष्ठ कर्मचारी सुनील देशमाने, अंकुश शेवाळे, देवसंस्थान कर्मचारी, पुजारी, सेवेकरी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमधील प्रथम वंदनीय व आराध्यदैवत लाडक्या गणरायाचे आगमनाने जेजुरी शहर व परिसरात धार्मिक व मंगलमय वातावरण होते. शुक्रवारी ( दि.९ ) सकाळपासूनच लाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी बाळगोपाळांची गर्दी होती. प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करीत ढोल ताशांच्या निनादात बाप्पांना घरी नेले जात होते. वातावरण धार्मिक, मंगलमय असले तरी कोरोना महामारीचे सावट यंदाही उत्सवावर दिसून येत होते. दुपारी १ पर्यंत शहरातील घरोघरी बाप्पा विराजमान झाले. तर शहरामध्ये ३० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेतल्याचे समजते.
जेजुरीगडावर गणेश वंदनाला प्रथम स्थान खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असले तरी तो शिवशंकराचा अवतार समजला जातो, येथे मल्हारी मार्तंडाचे देवदर्शन किंवा कुलधर्म -कुलाचार करताना,
प्रथम वंदन हे शिवशंकर पुत्र श्रीगणरायाला करावे लागते .
गडाच्या प्रथम पायरीपासून प्रथमतः लक्ष वेधून घेते ती शारदा गणेशाची मूर्ती, त्यानंतर हेगडीप्रधान मंदिरावर,दीपमाळा व गडकोट आवारामध्येही पुरातन दगडी बांधकामांवर विविध रुपातील श्रीगणेश कोरलेले आहेत, १०व्या ११ व्या शतकामध्ये निर्माण केलेल्या खंडेरायाच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी संगमरवरी दगडातील श्रीगणेश भाविकांचे लक्ष वेधून घेते तर गडकोट आवारातील सर्व देवदर्शन झाल्यानंतर पुन्हा साक्षीविनायकाचे दर्शन घ्यावेच लागते. अशी येथे परंपरा आहे.
फोटो मेल केला आहे
जेजुरी गडावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेला गणराया.
100921\img_20210910_110422.jpg
?????? ??????? ??????