मुळशी इंडस्ट्री असोसिएशनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:53+5:302021-04-19T04:08:53+5:30
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा चे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाइन पद्धतीने ...
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागा चे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाइन पद्धतीने या असोसिएशनची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
मुळशी तालुक्यामध्ये लहान-मोठ्या अशा एकूण सातशेपेक्षा अधिक कंपन्या असून गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून अधिक काळ उलटला गेला तरी तालुक्यातील अनेक कंपन्यांचे अजून ही वीज,पाणी,रस्ते असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. तेव्हा या प्रश्नानसह अनेक कंपन्यांच्या असणाऱ्या लहान-मोठ्या विविध अडचणी सोडविण्यासाठीच मुळशी तालुक्यातील अनेक कंपन्यांनी एकत्र येऊन मुळशी इंडस्ट्री असोसिएशनची स्थापना केल्याची माहिती सतीश कारंजकर यांनी दिली
तसेच या असोसिएशनचा फायदा हा सर्वच कंपन्यांच्या हितासाठीच होणार असल्याचा विश्वास देखील रमण गोवित्रीकर यांनी व्यक्त केला.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमामध्ये रमण गोवित्रीकर यांनी या इंडस्ट्री असोसिएशनची कार्यकारिणीही जाहीर केली. तेव्हा या मध्ये अध्यक्षपदी ब्रिनट कार्पेटचे सतीश कारंजकर,सचिवपदी सुगंधा तनेजा तर सरचिटणीस पदी मुबिया कंपनीचे एच.आर.प्रमुख रमणं गोवित्रीकर यांची निवड करण्यात आली याच बरोबर कोषाध्यक्षपदी वॉस कंपनीचे देवेंद्र चौधरी तर मुख्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी व्हलकन कंपनीचे रवींद्र घेवडे,बाॅब्स्ट कंपनीचे तानाजी काळे,कैझर कंपनीचे नारायण कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे
यावेळी सुरवसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व असोसिएशनला शुभेच्या दिल्या याचबरोबर तहसीलदार अभय चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन हे सुगंधा तनेजा यांनी केले, तर प्रास्ताविक सतीश कारंजकर यांनी केले व रमण गोवित्रीकर यांनी आभार मानले.
मुळशी इंडस्ट्री असोसिएशन कमिटीचे पदाधिकारी व सदस्य