येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:39 PM2022-02-04T18:39:11+5:302022-02-04T18:39:29+5:30

महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे

Establishment of inquiry committee in Yerawada accident case under the chairmanship of District Collector | येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

googlenewsNext

पुणे : येरवडा येथील शास्त्रीनगर येथे एका इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू असताना गुरूवारी (दि. ३) रात्री ११ च्या सुमारास स्लॅब बांधणीचे काम सुरू असताना तो कोसळला. त्यामुळे त्याखाली दबून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण गंभीर जखमी आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी (शोध समिती) महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे. या समितीने अंतिम अहवाला येत्या दहा दिवसांत शासनाला सादर करायचा आहे.

या दुर्घटनेप्रकरणी तातडीने कारवाई करून कामाच्या तीन दिवसांमध्ये संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून घेऊन तसेच प्राथमिक अहवाल शासनाला सादर करायचा आहे. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित प्रत्यक्षदर्शी व्यक्तींची साक्ष घेऊन सर्वकश तपासणी करून अंतिम अहवाल कामाच्या दहा दिवसांमध्ये पूर्ण करून शासनाला या दहा जणांच्या समितीने सादर करायचा आहे.

येरवडा दुर्घटना चौकशी समितीतील सदस्य पुढलीप्रमाणे...

१) अध्यक्ष- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
२) सदस्य- पोलीस उप आयुक्त, झोन-४ रोहिदास पवार
३) सदस्य- नगररचना सहायक संचालक अभिजित केतकर
४) सदस्य- सार्वजनिक बांधकाम विकास विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण
५) सदस्य- पुणे महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबिले
६) सदस्य- कामगार कल्याण विभाग उपआयुक्त अभय गिते
७) सदस्य- स्ट्रक्चरल इंजिनिअर धैर्यशिल खैरे-पाटील
८) सदस्य- आर्किटेक्ट संदीप बावडेकर
९) सदस्य- संजय देशपांडे
१०) सदस्य सचिव- पुणे महापालिका बांधकाम विकास विभाग अधीक्षक अभियंता सुधीर कदम

Web Title: Establishment of inquiry committee in Yerawada accident case under the chairmanship of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.