Pune: सायबर गुन्ह्यांना बसणार आळा! सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर कक्ष' स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:20 AM2022-10-11T01:20:53+5:302022-10-11T11:55:01+5:30

शिवाजीनगर ठाण्याच्या सायबर टीमने केले तक्रारीचे तत्काळ निवारण...

Establishment of separate cyber room in all police stations of Pune city | Pune: सायबर गुन्ह्यांना बसणार आळा! सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर कक्ष' स्थापन

Pune: सायबर गुन्ह्यांना बसणार आळा! सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर कक्ष' स्थापन

googlenewsNext

पुणे : नागरिकांना सायबर गुन्ह्यांसंबंधित तक्रार स्थानिक पातळीवर देता यावी आणि त्यांना लवकर न्याय मिळावा, यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आता स्वतंत्र सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात शिवाजीनगर ठाण्याच्या सायबर टीमने तर तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डमधून गेलेले २ लाख ८९ हजार १९७ रुपये तत्काळ तक्रारदाराला परत करण्यात यश मिळविले आहे.

तत्काळ छडा लावलेली पहिलीच केस

- एका कंपनीच्या चीफ मॅनेजरने शिवाजीनगर ठाण्याच्या सायबर टीमकडे तक्रार केली. त्यांना मुंबई येथील हॉटेल बुकिंग करायचे होते. त्याकरिता त्यांनी गुगल सर्च करुन तेथे उपलब्ध मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता सायबर गुन्हेगाराने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी घेऊन त्यांच्या अकाऊंटमधून फ्लिपकार्टद्वारे २ लाख ९४ हजार ३८९ रुपयांची खरेदी केली, असे तक्रारीत म्हटले होते.

- या तक्रारीच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर टीमने तत्काळ फ्लिपकार्टला मेल करून तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्डमधून गेलेले २ लाख ८९ हजार १९७ रुपये रिफंड करण्यात यश मिळविले आहे. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सायबर कक्ष स्थापन झाल्यानंतर यशस्वी झालेली ही पहिलीच केस म्हणता येईल.

सायबर चाेरीचे चित्र

पुणे पोलिसांकडे सायबर गुन्ह्यांच्या दरवर्षी सरासरी वीस हजार तक्रारी येतात. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारातील सायबर पोलीस ठाण्यात दररोज साधारणपणे शंभर तक्रारी येण्याचे प्रमाण आहे. सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या, गुन्ह्यांची वाढती व्याप्ती आणि शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यावर पडत असलेला भार पाहता प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर कक्ष सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार शहरातील सर्व ३१ पोलीस ठाण्यांमध्ये आता सायबर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी तसेच एका अधिकाऱ्याला सायबर गुन्हे नोंदवून घेणे, तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. परदेशातून भेटवस्तू, परदेशात नोकरी, गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री आणि विवाह अशी आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक तसेच ई-मेल हॅक करणे, समाजमाध्यमात बदनामी, लोनॲपद्वारे तत्काळ कर्ज, लोनॲपच्या कर्जानंतर होणारे आर्थिक आणि लैंगिक शोषण अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

...ही खबरदारी घ्या

- अनोळखी / अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका.

- सायबर तक्रारींची नोंद http:/cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाईनवर तत्काळ नोंदवा.

Web Title: Establishment of separate cyber room in all police stations of Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.