आदिवासिंना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा हक्क कृती समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:37+5:302020-12-30T04:15:37+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अनुसूची क्षेत्रात पेसा अंतर्गत कायम स्वरूपी रहाणाऱ्या बिगर आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक मायंबावाडी येथील हॉटेल ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अनुसूची क्षेत्रात पेसा अंतर्गत कायम स्वरूपी रहाणाऱ्या बिगर आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक मायंबावाडी येथील हॉटेल स्किविरल येथील सभागृहात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष बोऱ्हाडे बोलत होते.या बैठकी दरम्यान नवनिर्वाचीत पेसा हक्क कृती समितीची स्थापना करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष पदी डी. बी. बोऱ्हाडे,कार्याध्यक्ष पदी दत्ता भाऊ कोकणे तर महासचिव पदी गौतमराव खरात यांची निवड करण्यात आली.तर खजिनदार पदी पुरुषोत्तम फदाले उपाध्यक्षपदी प्रदीप अमोंडकर, मंगेश बोऱ्हाडे,राम फलके ,अमोल अंकुश गफुर तांबोळी यांची निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणुन दत्ता वाळुंज महिला प्रतिनिधी म्हणून सरोज कोकणे, प्रियांका साबळे ,अश्विनी कोकणे यांची तर सल्लागार म्हणून मधु अप्पा बोऱ्हाडे, आत्माराम बोऱ्हाडे, सिताराम लोहोट भरत फदाले यांना नियुक्त करण्यात आली आहे.
यावेळी महासचिव गौतमराव खरात म्हणाले पेसा क्षेत्रात जे खुल्या वर्गातील ,इतर मागास प्रवर्ग ,अनु. जाती विशेष मागास प्रवर्गाला राजकीय सामाजिक शैक्षणिक नोकऱ्या मध्ये आरक्षण मिळत नाही ते मिळविण्यासाठी पेसा हक्क कृती समितीच्या माध्यमातून सवलती पासून वंचित समाजाला न्याय देण्यासाठी ही कृती समिती काम करणार आहे.असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी तालुक्याच्या पश्चिम भागातील बांधव महिला उपस्थित होत्या.
--
फोटो क्रमांक - २९ तळेघर
फोटो ओळी : मायंबावाडी येथील बैठकी दरम्यान पेसा हक्क कृती समितीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डी.बी. बाऱ्हाडे