वाल्हे येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:06+5:302021-03-13T04:21:06+5:30
या वेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, प्रहार पुरंदर तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, सासवड ...
या वेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, प्रहार पुरंदर तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, सासवड शहर संघटक संदीप जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संत्यवान सूर्यवंशी, समता परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल भुजबळ, गणेश भुजबळ, सुजीत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वाल्हे शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते सत्कार करून, शुभेच्छा देण्यात आल्या व सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाल्हे शाखा अध्यक्ष निलेश कुदळे, उपाध्यक्ष सचिन खवले, कार्याध्यक्ष सुभाष शिंदे, विशाल भुजबळ, सचिव महादेव भुजबळ, सहसचिव अनिकेत पवार, खजिनदार स्वप्निल भुजबळ सहखजिनदार उमेश जाधव आदींनी सहकार्य केले.
--
फोटो क्रमांक : १२ वाल्हे अपंग क्रांती संघटना
फोटो ओळ. प्रहार अपंग क्रांती अंदोलन संघटनेच्या फलकाचे उद्घाटन करते वेळी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे,सरपंच अमोल खवले,दत्ता अण्णा पवार,अध्यक्ष निलेश कुदळे व इतर.