जेजुरीत घरोघरी उत्साहात श्री गणेशाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:26+5:302021-09-11T04:12:26+5:30
सकाळीच श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने गावातून वाजतगाजत मूर्ती गडावर नेऊन श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. दिवसभर ग्रामस्थांनी श्री गणेशाची ...
सकाळीच श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने गावातून वाजतगाजत मूर्ती गडावर नेऊन श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. दिवसभर ग्रामस्थांनी श्री गणेशाची मूर्ती घरोघरी वाजत गाजत, जयघोष करीत स्थानापन्न केली. कोरोनाचे संकट असले तरी नियम पाळत ग्रामस्थांनी अतिशय उत्साहाने गणरायाचे स्वागत केले. जेजुरी शहरात तीसहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. कोरोनाच्या संकटाने बंधने असल्याने मंडळात उत्साह कमी होता. रात्री उशिरापर्यंत मंडळांनी श्री गणेशाच्या मूर्तींची स्थापना केली.
--
आठ दुकानांतून ३० हजार मूर्तींची विक्री
जेजुरी नगरीत गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत सकाळपासूनच गजबज पाहण्यास मिळाली. गणपतीच्या मूर्ती विक्रीचे पाच स्टॉल थाटण्यात आले होते. या आठ दिवसांत या दुकानांतून लहान-मोठ्या तीन हजार मूर्तींची विक्री झाल्याचे मूर्तिकार मच्छिंद्र कुंभार यांनी सांगितले. मूर्तींच्या दुकानाबरोबरच सजावटीच्या वस्तू, हार, फुले, दुर्वा, फळे, मिठाईची दुकाने ग्राहकांनी फुलून गेली होती.
--
फोटो क्रमांक : १० जेजुरी गणेशोत्सव
फोटो ओळी : जेजुरी येथे श्री गणेशाची मूर्ती घेऊन जाताना गणेश भक्त.
100921\img_20210910_140149.jpg
गणेश मूर्ती घेऊन जाणारे भक्त