लग्न होऊन आठ महिने झाले तरी नवरा जवळ येईना; नववधुने चौकशी करताच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 07:55 PM2023-02-09T19:55:08+5:302023-02-09T19:59:19+5:30

पतीसह सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल...

Even after eight months of marriage, the husband does not come near; When the bride inquired, she was shocked | लग्न होऊन आठ महिने झाले तरी नवरा जवळ येईना; नववधुने चौकशी करताच बसला धक्का

लग्न होऊन आठ महिने झाले तरी नवरा जवळ येईना; नववधुने चौकशी करताच बसला धक्का

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे : लग्न होऊन आठ महिने झाले तरीही नवरा बायकोच्या जवळ झोपण्याऐवजी दूर जाऊन झोपत होता. बायकोने विचारल्यानंतर मला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही असं सांगायचा. लग्नाच्या आठ महिन्यानंतर तिला आपला पती शरीरसंबंध ठेवण्यासाठी असमर्थ असल्याचे लक्षात आले अन्  तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर तिने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला तीस वर्षे वयाची आहे. जून 2022 मध्ये तिचा पुण्यातील एका तरुणासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री तिचा पतीच्या जवळ झोपला नाही. दूर अंतरावर जाऊन तो झोपला. लग्नाच्या आठ महिन्यानंतर ही हीच परिस्थिती होती. त्यामुळे या महिलेला शंका आली. तिने अधिक चौकशी केली असता तिचा नवरा शरीरसंबंध ठेवण्यास अपात्र असल्याचे तिच्या लक्षात आले.

याबाबत फिर्यादीने कुठेही वाचता करू नये यासाठी तिला वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आले. इतकेच नाही तर धमकी देऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अखेर या महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Even after eight months of marriage, the husband does not come near; When the bride inquired, she was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.