रेमडेसिवीरसाठी नावनोंदणी करूनही इंजेक्शन न मिळाल्याने नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 14:00 IST2021-04-11T13:59:11+5:302021-04-11T14:00:02+5:30

रुबी हॉल क्लिनिकमधील धक्कादायक प्रकार

Even after registering for Remedesivir, no injection was received | रेमडेसिवीरसाठी नावनोंदणी करूनही इंजेक्शन न मिळाल्याने नागरिक संतप्त

रेमडेसिवीरसाठी नावनोंदणी करूनही इंजेक्शन न मिळाल्याने नागरिक संतप्त

ठळक मुद्देरुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आम्ही इंजेक्शन राखीव ठेवले आहेत. ते तुम्हाला देऊ शकत नाही - रुग्णालयाचे उत्तर

पुणे: राज्यासहित पुण्यातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी सर्वच रुग्णालयात चौकशी करत आहेत. अशा परस्थितीत रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

काल रुबी हॉलकडून रेमडेसिवीरसाठी नागरिकांची नावनोंदणी करून घेण्यात आली होती. इंजेक्शन आज सकाळी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु सकाळी इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. क्लिनिकच्या बाहेर जवळपास दोनशेहुन अधिक जण इंजेक्शन साठी जमा झाले होते. नागरिकांनी इंजेक्शन का मिळणार नाही असा प्रश्न उपस्थित केला असता, " रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आम्ही इंजेक्शन राखीव ठेवले आहेत. ते तुम्हाला देऊ शकत नाही", असे उत्तर रुग्णालय प्रशासनकडून मिळाले आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. परंतु शेवटी पोलिसांनी सर्व नागरिकांना विनंती करून बाहेर पाठवले. पर्याय नसल्याने नागरिकांना रुग्णालयाबाहेर थांबता आले नाही.  

गेल्या आठवड्यापासून हे  इंजेक्शन न मिळाल्याने गंभीर रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. सद्यस्थितीत प्रशासन रेमडेसिवीर पुरवण्याचे आश्वासन देत आहे. मात्र प्रत्यक्षात कुठेही रुग्णालयात ते उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालये इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी चकरा मारूनही नकाराचे उत्तर मिळत आहे. 

Web Title: Even after registering for Remedesivir, no injection was received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.