या वयातसुद्धा शरद पवारांना फिरावे लागते हे क्लेषदायक : विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:54 PM2019-09-23T16:54:15+5:302019-09-23T17:01:34+5:30
पुण्यात सोमवारी शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेशही केला. या कार्यक्रमानंतर मेटे यांनी माध्यमांशी बातचीत केली.
पुणे : शरद पवार हे राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दलचा सगळ्यांनाचा आदर आहे. मात्र या वयातही त्यांना फिरावे लागते हे क्लेशदायक असल्याचे मत शिवसंग्रामचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.
पुण्यात सोमवारी शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेशही केला. या कार्यक्रमानंतर मेटे यांनी माध्यमांशी बातचीत केली.
ते म्हणाले की, पवार सध्या ज्या पद्धतीने फिरत आहेत त्याचे दुःख होते. त्यामुळे राष्ट्रवादीत स्वतःला तरुण नेते म्हणवून घेतात त्यांनी ही जबाबदारी उचलायला हवी होती. मात्र दुर्दैवाने दिसणारे चित्र हे क्लेषदायक असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी युतीच्या जागावाटपावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांची जागा वाटप होईल आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील असे सांगितले होते..पण तसे काही होताना आता दिसत नाही. युतीची चर्चा होत असताना भाजपने इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. अन्यथा युती नाही झाली तरीही शिवसंग्रामही स्वतंत्र लढण्यास तयार आहे असा इशाराही त्यांनी दिला.