कोविड पॉझिटिव्ह मतदारांनीही मतदानाचा हक्क चुकवू नये, फक्त काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:02+5:302021-01-14T04:11:02+5:30
जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडत आहे. पुरंदर प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत ...
जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडत आहे. पुरंदर प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत तयारी केलेली असून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची ही काळजी घेतली जात आहे. या निवडणुका कोविड महामारीच्या पार्श्व्भूमीवर होत असल्या तरीही कोविड पॉझिटिव्ह मतदारांनीही योग्य ती काळजी घेत मतदान करावे. अशा मतदारांनी शेवटच्या तासात मतदान केंद्रावरील अधिकार्यांना कल्पना द्यावी. मगच मतदान करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.
येत्या १५ जानेवारी रोजी होणार्या निवडणुकीत ४१७ जागांसाठी ८९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने २०१ मतदान केंद्रे आणि १३०० कर्मचार्यांची नेमणूक केलेली आहे.पोलिस प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील परिसरात पथसंचलन करून मतदान शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच यावेळात मतदान घेतले जाणार असून सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून कर्मचारी नेमले आहेत. येणार्या प्रत्येक मतदाराची तपासणी व सनीटायझेशन करण्यात येणार आहे. मतदारांनी मास्क लावूनच मतदान केंद्रात प्रवेश करायचा आहे. तपासणीच्या वेळेस एखाद्या मतदाराला ताप जाणवला तर त्याला शेवटच्या तासात मतदान करावे लागणार आहे. त्याच बरोबर पॉझिटिव्ह मतदारणी ही मतदान केंद्रावरील अधिकार्यांना अगोदर कल्पना द्यावी. व मतदानाचा हक्क बजवावा. कोणी ही आपला मतदानाचा हक्क डावलू नये असे आवाहणही करण्यात आले आहे.