कोरोना काळातही दुकानदारांकडून भेसळीचे प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:44+5:302021-08-19T04:15:44+5:30

(स्टार १०५१ डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळ असो सणासुदीचा काळ. कितीही कारवाई करा, काही फरक पडत ...

Even during the Corona period, shopkeepers uncovered types of adulteration | कोरोना काळातही दुकानदारांकडून भेसळीचे प्रकार उघडकीस

कोरोना काळातही दुकानदारांकडून भेसळीचे प्रकार उघडकीस

Next

(स्टार १०५१ डमी)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना काळ असो सणासुदीचा काळ. कितीही कारवाई करा, काही फरक पडत नाही. शहरातील अनेक दुकानदार काही भेसळीची पदार्थ बनवणे सोडत नसल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कोरोनाकाळात अन्न व औषध प्रशासनाने तब्बल २३७२ तर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ४१९ दुकानदारांकडून नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात भेसळ केलेल्या कमी दर्जाच्या १४९ तर दर्जाहीन असुरक्षित असे ९८ अशा एकूण २४७ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

श्रावण महिन्यापासून राज्यात विविध सणांची रेलचेल असते. त्यामुळे सणासुदीला अनेकजण तयार पदार्थ मागवत असतात. मागणी जास्त असल्याने अनेक उत्पादक कमी काळात पुरवठा करण्यासाठी नियमांशी तडजोड करून मालाचे उत्पादन करतात. त्यात भेसळ जास्त होत असल्याच्या दरवर्षी तक्रारी येत आहेत. अन्न आणि औषध प्रशासन सातत्याने कारवाई करत आहे. मात्र, तरीही उत्पादक भेसळयुक्त पदार्थ बनवत आहेत.

-----

दीड वर्षातील कारवाई

कालावधी घेतलेले नमुने कमी दर्जाचे दर्जाहीन असुरक्षित

(एप्रिल २०२० मार्च २०२१) २३७२ ११४ ४६ ३५

एप्रिल २०२१ १२ ०३ ०१ ०२

मे २०२१ २६ ०७ ०२ ०५

जून २०२१ १२४ १५ ०२ ०२

जुलै २०२१ २५७ १० ०३ ००

एकूण २७९१ १४९ ५४ ४४

-----

* कोरोनाकाळात २५ टक्के नमुन्यात भेसळ

कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन ते मार्च २०२१ या काळात अन्न आणि औषध प्रशासनाने २३७२ नमुने घेतले होते. त्यात त्यांना कमी दर्जाचे ११४ नमुने आढळून आले, तर दर्जाहीन नमुने ४६ तसेच आगदी असुरक्षित असणाऱ्या ३५ नमुने आढळून आले आहेत. तर १०६० नमुन्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

----

* खरेदी करताना घ्या काळजी

ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करताना मुख्यत: त्या वस्तूवरील एक्स्पायरी डेट तपासून पाहावी. आयएसओ मानांकन पाहावे. त्याचबरोबर मुख्यत: पदार्थ बनवताना संबंधित उत्पादक/दुकानदार कोणत्या प्रकारचे साहित्य वापरत आहे. हे तपासून पाहावे. कारण असुरक्षित आणि दर्जाहीन पदार्थ खाल्ल्यास आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले आहे.

-----

* कोट

अन्न व औषध प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे दुकानदारांनी वस्तुंचे उत्पादन केले आहे की नाही. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या साहित्याचा वापर केला हे ग्राहकांनी तपासून पाहावे. भेसळयुक्त पदार्थ खरेदी करू नये. अन्यथा आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते.

- अधिकारी, अन्न व औषध प्रशासन

Web Title: Even during the Corona period, shopkeepers uncovered types of adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.