रामनवमीची सुटी असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील सर्व कार्यालये सुरू

By नितीन चौधरी | Published: March 29, 2023 07:21 PM2023-03-29T19:21:28+5:302023-03-29T19:21:45+5:30

मार्चअखेर असल्याने दस्त नोंदणीसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी

Even during the Ram Navami holiday all the offices of Dast Registration in the Haveli will remain open | रामनवमीची सुटी असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील सर्व कार्यालये सुरू

रामनवमीची सुटी असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील सर्व कार्यालये सुरू

googlenewsNext

पुणे: १ एप्रिलपासून राज्यात मालमत्ता खरेदीसाठी नवे रेडीरेकनर अर्थात बाजारमूल्य दर घोषित होतात. त्यामुळे मार्चअखेर दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी होती. त्याअनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागाने गुरुवारी (दि. ३०) रामनवमीची सुटी असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील सर्व २७ कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी रामनवमीनिमित्त सरकारी सुटी आहे; मात्र मार्चअखेर असल्याने दस्त नोंदणीसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी असते. सुटीमुळे ग्राहकांना अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनकडून गुरुवारीही कार्यालये सुरू ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच एक एप्रिलला नवे रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. त्यामुळे अनेक ग्राहकांचा मार्चअखेर दस्त नोंदणीकडे कल असतो. या काळात गर्दी होत असते. या बाबी लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी हवेलीतील सर्व २७ कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या व पक्षकारांच्या सोयीसाठी ही कार्यालये कार्यालयीन वेळेत सुरू राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी दिली.

Web Title: Even during the Ram Navami holiday all the offices of Dast Registration in the Haveli will remain open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.