Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार

By नम्रता फडणीस | Published: August 27, 2024 05:35 PM2024-08-27T17:35:01+5:302024-08-27T17:35:30+5:30

सहकारनगर आणि कोंढवा भागात २ घटना, एका घटनेत पत्नीला बेेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण, दुसऱ्या घटनेत पत्नीवर वार

Even housewife in the house is not safe The wife was beaten and stabbed with a sharp weapon by the husband in pune | Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार

Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून तसेच एकत्र संसार करण्यास नकार देण्याच्या कारणावरुन् पत्नीला मारहाण व शस्त्राने वार करण्याच्या दोन घटना शहरात सहकारनगर आणि कोंढवा भागात घडल्या असून, पतींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत चारित्राच्या संशयावरुन पत्नीला बेेशुद्ध होई पर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने सहकारनगरपोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ तळजाई वसाहत पद्मावती परिसरात घडली. आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत होता. यावेळी पत्नी घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी पत्नीला खाली पाडून तो तिच्या अंगावर बसला आणि गळा दाबून तिला बेशुद्ध केले. यानंतर आरोपी पती घराची कडी बाहेरुन लावून पसार झाल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

दुसरी घटना दि. २५ ऑगस्ट रोजी इंदिरानगर गल्ली नंबर १ येथे घडली आहे. सोबत राहण्यास नकार देणार्या पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार राजवली हारुन मुलाणी (रा. शहाजी नगर. बावडा, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या गेल्या एक वर्षापासून पती पासून वेगळ्या राहत होत्या. त्या इंदिरानगर येथे एका नातेवाईकाच्या घरी भाड्याने राहत होत्या. दरम्यान, फिर्यादी यांची पती त्यांना बोलण्यासाठी आले होते. यावेळी आरोपीने फिर्यादी पत्नी सोबत राहून संसार करु असे विचारले असता त्यांनी नकार दिला. याचा राग आल्याने पतीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने पत्नीच्या मानेवर तीन ते चार वार करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक़ रविंद्र गोडसे करत आहेत.

Web Title: Even housewife in the house is not safe The wife was beaten and stabbed with a sharp weapon by the husband in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.