धरणे फुल्ल तरीही पुणेकरांच्या माथी पाणी कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:26 PM2019-08-27T20:26:00+5:302019-08-27T20:28:24+5:30

खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे १०० टक्के भरलेली असतानाही दुरुस्तीच्या नावाखाली पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारली जात आहे.

Even if the dam is full, why water cutting in the Pune | धरणे फुल्ल तरीही पुणेकरांच्या माथी पाणी कपात

धरणे फुल्ल तरीही पुणेकरांच्या माथी पाणी कपात

Next
ठळक मुद्दे दुरुस्तीचे कारण : धरणामधून ग्रामीण भागासाठी पाण्याचा विसर्ग सुरुविविध भागांमध्ये पुर्वीप्रमाणे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे १०० टक्के भरलेली असतानाही दुरुस्तीच्या नावाखाली पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारली जात आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांच्या अखत्यारीतील कात्रज, कोंढवा बु. या भागात पाण्याची टाकी, पाईप लाईन्स, पंप हाऊसच्या दुरुस्तीची कामे करावी लागणार असल्याने या केंद्रावर अवलंबून असलेल्या विविध भागांमध्ये पुर्वीप्रमाणे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागासाठी धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे. पालिकेच्या या नियोजनामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

सोमवार :- भारती विद्यापीठ परिसर, चंद्रभागानगर, फालेनगर, बाळकृष्ण सोसायटी परिसर, राजमुद्रा सोसायटी परिसर, अक्षयनगर परिसर, आंबेगाव पठार परिसर स.नं. १५ ते स. नं. ४१ इ. 

मंगळवार :- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, कांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर, खोराडवस्ती परिसर. संपुर्ण वडगाव परिसर इ.

बुधवार :- सहकारनगर, धनकवडी गाव परिसर, तळजाई ग्रीन परिसर, स. नं. २, ३, बालाजीनगर इ. 

गुरुवार :- बाबुराव सणस विद्यालय परिसर, उत्कर्ष सोसायटी परिसर, लेन नं. १ ते ३४ परिसर, चव्हाणबाग, डि. एस. के. रोड, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड 
फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, लोकमत कार्यालय परिसर, आनंद मंगल कार्यालय परिसर, अभिरुची परिसी, समर्थनगर, दांगटनगर, वडगाव बु।। हायवे बायपास परिसर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनिसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ.

शुक्रवार :- संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, अंजलीनगर, जांभुळवाडी रस्ता, टेल्को कॉलनी, लेक -विस्टा सोसायटी परिसर इ.

शनिवार :- राजीव गांधी नगर, चैत्रबन वसाहत, पद्मावतीनगर, अंबिका नगर, पवन नगर, श्रेयस नगर, काकडे वस्ती, अशरफ नगर, ग्रीन पार्क, हगवणे वस्ती, कोंढवा बुद्रुक गाव, पुण्यधाम आश्रम रस्ता, कामठेनगर, बधे वस्ती, टिळेकरनगर भाग-१, साईनगर, गजानन नगर, पारगेनगर, येवलेवाडी, सरगम चाळ, अजमेरा पार्क, रॉयलपार्क परिसर, लक्ष्मीनगर परिसर, शिवशंभोनगर, ाहिंदनगर, शेळकेवस्ती, सावरकरनगर, गणेशनगर, महानंदा सोसायटी, तुळजाभवानीनगर, खामकरवस्ती, प्रेमनगर, संगम हॉटेल, स्वामी समर्थनगर, विणू मेहतानगर, आंबेडकरनगर परिसर, खडकेवस्ती इ.

रविवार :- कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, गोकुळनगर, शिवशंभो नगर, भारतनगर, राजस सोसायटी, भूषण व इंद्रप्रस्थ सोसायटी, सुखसागरनगर भाग १ व भाग २, बनकर शाळा परिसर, महादेवनगर, उत्कर्ष सोसायटी परिसर, शेलारमळा, वरखडेनगर, जाधवनगर, विद्यानगर परिसर, आनंदनगर परिसर, माऊलीनगर, विघ्नहर्तानगर, सुंदरबन परिसर, शिक्षक सोसायटी, टिळेकरनगर भाग-२, स्वामी समर्थनगर इ.

Web Title: Even if the dam is full, why water cutting in the Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.