सर्व ऑनलाईन झाले तरी वजन ठेवावेच लागतं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:49+5:302021-09-12T04:14:49+5:30
शासकीय कार्यालयातील अनेक गोष्टी आता ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात जावे लागत नाही. असे लोकांना वाटत असेल. अशा छोट्या-मोठ्या ...
शासकीय कार्यालयातील अनेक गोष्टी आता ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात जावे लागत नाही. असे लोकांना वाटत असेल. अशा छोट्या-मोठ्या गोष्टीमधील टेबलाखालून जे द्यावे लागत होते. ते आता द्यावे लागणार नाही, असा लोकांचा समज झाला असेल, तर तसे नाही. एका शोरूममध्ये काही जण गाडी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गाडी पंसत केल्यावर रजिस्टेशनचा मुद्दा आला. आरटीओमध्ये गाडी पाठवायला लागेल, तेव्हा गाडीची डिलिव्हरी कधी मिळेल, याची चर्चा सुरू झाली. तेव्हा शोरूममधील व्यवस्थापक सांगू लागले की, आता गाडी आरटीओला न्यावी लागत नाही. शोरुममध्येच रजिस्टेशन होते, ऑनलाईन नंबर पण मिळतो. तेव्हा या मधील जाणकार असलेले मित्र म्हणाले, म्हणजे आता तुमचे पैसे वाचत असेल, तो आम्हाला डिस्काऊंट दिला पाहिजे. त्यावर ते व्यवस्थापक म्हणाले, असे काही नाही, सर्व्हिस ऑनलाईन झाली तरी कागदपत्रे एकत्रितपणे नंतर सादर करावीच लागतात. तेव्हा या कागदपत्रांवर वजन ठेवावेच लागते.