... तर त्यांचादेखील जीव गेला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:27 AM2017-11-21T01:27:25+5:302017-11-21T01:27:32+5:30
अकोले : निरा-भिमा अस्तरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी आज क्रेन तुटल्याची ही दुसरी वेळ आहे
-विजय गायकवाड
अकोले : निरा-भिमा अस्तरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी आज क्रेन तुटल्याची ही दुसरी वेळ आहे. दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार येथे घडला होता. सुदैवाने लिफ्ट वर आल्यानंतर वायररोप तुटला. त्यामुळे लिफ्टमधील कामगार बचावले. मात्र, या घटनेच्या भीतीने ते कामगार त्याच वेळी काम सोडून निघून गेले. त्यामुळे ते बचावल्याची माहिती मिळत आहे; अन्यथा त्यांचाही जीव गेला असता.
नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे गेल्या २ महिन्यांपासून काम सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीतील पाणी तावशी येथून भादलवाडी मार्गे उजनीत या बोगद्याचे पाणी नेण्याचे नियोजन आहे. हे काम करण्यासाठी बोगद्यात उतरण्यासाठी तावशीपासून अकोल्यापर्यंत ५ ठिकाणी क्रेनची व्यवस्था आहे. त्यापैकी अकोले हे पाचवे ठिकाण आहे. बोगद्याच्या ठिकाणी एक क्रेन मजुरांसाठी तर दुसरी क्रेन माल वर काढण्यासाठी आहे. यासाठी २५ ते ३० मजूर २ शिफ्टमध्ये काम करतात. २ दिवसांपूर्वीच गंभीर प्रसंग येथील मजुरांच्या वाट्याला आला होता. क्रेनच्या लिफ्टद्वारे मजूर वर येताना कंट्रोलरला वायररोप कंट्रोल झाला नाही. लिफ्ट वर आल्यानंतर वायररोप तुटला. त्यामुळे सुदैवाने लिफ्टमधील ४ ते ५ कामगार बचावले. बोगद्यात असताना लिफ्ट तुटली तर काय घडले असते, या कल्पनेने कामगारांच्या अंगावर शहारे आले आणि त्याच वेळी हे कामगार काम सोडून निघून गेले. त्यामुळे हे कामगार बचावल्याची माहिती येथील कामगारांनी दिली.
>... अब हमे मरने
का डर लग रहा है
हम अपने गाव से दूर बीबी बच्चों को छोडकर पेट के लिए काम करने आये है । यहाँ दिन-रात काम करने की कोशिश करते है । गहरे बोगदे मे उतरने का ही डर लगता है, लेकिन फिरभी काम करते है । वहाँ ब्लास्टिंग के बाद निकलनेवाली मिट्टी उपर भेजते है । चार घंटे बाद हम उपर आते है । आज वायररोप का सर्व्हिंसिंग, ग्रीसिंग किया होता तो ये काला दिन देखना ना पडता । इन लोगोंने हमारे सेफ्टी के बारे में सोचा नहीं । इस दुर्घटना के बाद हमे अब मरने का डर लग रहा है । यहाँ रुकने को दिल नही करता । अब हम गाव जाना चाहेंगे, अशी प्रतिक्रिया शोकाकुल कामगारांनी व्यक्त केली.