Sanjay Raut : 'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा

By नम्रता फडणीस | Published: November 15, 2024 05:55 PM2024-11-15T17:55:36+5:302024-11-15T17:57:25+5:30

शिवसेनेच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्या तरी पक्ष चांगल्या जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

'Even if we ran away from the party, we did the work to save the party' Sanjay Raut targets Eknath Shinde | Sanjay Raut : 'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut : 'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेत येईल असा दावा करीत, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. शिवसेनेच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्या तरी पक्ष चांगल्या जागा जिंकेल असा विश्वास शिवसेनेचे ( उ बा ठा ) ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. शहर व परिसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयत्ता गँगने धुमाकूळ घातला आहे.

यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे की नाही? असा सवाल उपस्थित करीत आता जनता जागृत झाली आहे. ती निर्णय घेईल असेही ते म्हणाले. कोथरूड विधानसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी संजय राऊतकोथरुडमधील मोकाटे यांच्या कार्यालयात आले होते.

राऊत म्हणाले, गेल्या तीन वर्षात उबाठा पक्ष टिकवण्याचं अवघड कार्य आम्ही करीत आहोत. भले भले पळून गेले. पण काही लोक अशी आहेत की काही मिळाले नाही तर चालेल, मोकाटे त्यातले आहेत. संकटकाळात ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. मोकाटे हे भूमीपुत्र आहेत. त्यांना संधी देऊन मतदारांनी बाहेरून आलेले पार्सल परत पाठवावे असा सूचक इशारा दिला.

मोकाटे म्हणाले, मी आमदार व नगरसेवक असताना चांगली विकासकामे केली. त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विकासच खुंटला. आपण चांदणी चौकात होणारे अपघात टाळण्यासाठी आंदोलन केली. या आंदोलनात माझ्या बरोबर सर्व पक्ष, कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्था सहभागी झाले. चांदणी चौकात उड्डाणपूल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आणि उड्डाणपूल उभारला.

ज्यांना भीती वाटते, त्यांना असे उद्योग करावे लागतात
निवडून येण्यासाठी आम्हाला सोन्याच्या रिंगा, पैशांची पाकीट वाटावी लागत नाहीत. ज्यांना भीती वाटते, त्यांना असे उद्योग करावे लागतात असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.
 

Web Title: 'Even if we ran away from the party, we did the work to save the party' Sanjay Raut targets Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.