पत्नी नोकरीस सक्षम असली तरी पोटगी द्यावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:14+5:302021-03-13T04:21:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नी नोकरी करण्यास सक्षम असली तरीही तिला पोटगी द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निकाल उच्च ...

Even if the wife is able to work, she has to pay alimony | पत्नी नोकरीस सक्षम असली तरी पोटगी द्यावीच लागेल

पत्नी नोकरीस सक्षम असली तरी पोटगी द्यावीच लागेल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नी नोकरी करण्यास सक्षम असली तरीही तिला पोटगी द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका दाव्यात दिला आहे. चांगले शिक्षण घेतलेल्या आणि नोकरी करण्याची ताकद असलेल्या पत्नीस पोटगी नाकारावी असा युक्तीवाद करीत पोटगी रद्द करण्यासाठीचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. कर्णिक यांच्या न्यायालयात या दाव्याची सुनावणी झाली.

पुण्यात राहत असलेले अक्षता आणि आशिष (नावे बदललेली) यांच्या दाव्यात हा निकाल झाला. वैचारिक मतभेदातून हे दांपत्य २०१६ पासून वेगळे राहत असून त्यांना मूलबाळ नाही. अक्षता या गृहिणी तर आशिष हे एका कंपनीत नोकरी करतात. वैवाहिक जीवनात झालेल्या वादामुळे अक्षता यांनी आशिष व त्यांच्या कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

तसेच स्वतंत्र राहत असल्याने पोटगी मिळण्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्यात झालेल्या सुनावणीनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना दरमहा ३५ हजार रुपयांची पोटगी मंजूर केली होती. अँड. पूजा अगरवाल यांनी अक्षता यांच्या वतीने बाजू मांडली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात आशिष यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. हे अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अक्षता या लग्नाआधी नोकरीला होत्या. पोटगी मिळावी म्हणून त्या घरी बसल्या आहेत. त्यामुळे पोटगीचा आदेश रद्द करावा, असा युक्तिवाद आशिष यांच्या वकिलांनी केला. मात्र त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत सत्र न्यायालयाने दिलेला पोटगीचा आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

------------------------------------------------------------------------------

Web Title: Even if the wife is able to work, she has to pay alimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.