Video: 'थोडा तिखा कम प्लिज', जपानच्या राजदूतालाही पुण्यातील वडापावची भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 04:21 PM2023-06-09T16:21:42+5:302023-06-09T16:22:29+5:30
जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी 'थोडा तिखा कम प्लिज' ट्विट करत मनाला सुख देणाऱ्या वडापावचा आस्वाद घेतला
पुणे : पाऊस सुरु झाला कि आठवण येते ती म्हणजे गरमागरम अशा खुशखुशीत वडापावची. कुठल्या माणसाला तो आवडणार नाही असं होतच नाही. बटाट्याच्या भाजीचे गोळे करून बेसनाच्या पिठात भिजवले जातात. त्यानंतर तेलात तळून वडे पावाबरोबर खायला तयार होतात. अशा चविष्ट पदार्थाची जिभेला चव लागल्यास मन कसं प्रसन्न होऊन जाते. नोकरदार वर्गाचा तर वडा-पाव हा विशेष आवडीचा आहे. सकाळी ऑफिसला जातांना असो किंवा संध्याकाळी घरी येतांना पार्सल असो, वडा-पाव हा आपल्याला ठराविक अंतराने नक्की मिळत असतो. बारीक पाऊस पडत असेल आणि गरमा गरम वडा-पावचा वास येत असेल तर त्या वडा-पाव च्या गाडीकडे न वळता घरी जाणं एक आव्हान असतं. या वडापावने आता भारताबरोबर परदेशी लोकांना भुरळ घातली आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी 'थोडा तिखा कम प्लिज' असा एक व्हिडिओ ट्विट करत मनाला सुख देणाऱ्या वडापावचा आस्वाद घेतला आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातही असंख्य नागरिक वडापावच्या प्रेमात आहेत. पुण्यात प्रसिद्ध वडापावच्या प्रत्येक दुकानाबाहेर नागरिक वडापाव खाताना दिसून येतात, तर गल्लोगल्ली असणाऱ्या हातगाड्यांवर लोकांची गर्दी दिसून येते. अशाच गार्डन वडापावच्या हातगाडीवर सुझुकी यांनी वडापावचा आस्वाद घेतला. त्यांना तो इतका आवडला कि त्यांनी ट्विट करून या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी मला भारतातील रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खूप आवडतात असेही ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.
I love street food of India🇮🇳
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 9, 2023
...but thoda teekha kam please!🌶️#Pune#Maharashtra#VadaPavpic.twitter.com/3GurNcwVyV
आपल्याला भूक लागली कि पटकन आणि स्वस्तात मिळणारा हा वडापाव आता जगभारत प्रसिद्ध झाला आहे. अनेक परदेशी नागरिक भारतात आल्यावर वडापावच्या शोधात असतात. त्यांना हे खाऊन मिळणार आनंदही ते सोशल मीडियातून व्यक्त करत असतात. मुंबईत जन्म झालेल्या वडापावची आता जगभरात चर्चा होत आहे. याचा भारतीयांना अभिमान असला पाहिजे.
वडापाव कितीही चमचमीत असला, स्वस्तात पोट भरणारा, अगदी चालता-चालता खाता येणारा असला, तरी त्याच्या अतिसेवनाचे तोटे आहेत, हेही आपण लक्षात ठेवू. त्यामुळे कधी तरी वडापाव खाणं आणि पूर्णान्न समजून वडापाव खाणं, यांत फरक आहे. त्यामुळे आपण वडापावला पूर्णान्न नाही; पण ‘वडापाव हे कधी तरी उदर भरणं’ असं म्हणून नकीच त्याचा आस्वाद घेऊ शकतो.