संकट काळातही राजगुरुनगर बॅंकेचा आलेख चढता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:07+5:302021-03-28T04:11:07+5:30
-- राजगुरुनगर : सभासदांच्या विश्वासार्हतेमुळे संकटकाळातही बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला असल्याचा उल्लेख उंचावला. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ...
--
राजगुरुनगर : सभासदांच्या विश्वासार्हतेमुळे संकटकाळातही बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला असल्याचा उल्लेख उंचावला. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गतवर्षी सर्व स्तरावरील अर्थव्यवस्था कोलमडली. अशाही स्थितीत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी वाढ झाली. कर्ज परतफेड सुद्धा चांगली आर्थिक स्थिती चांगली राहिली. असे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी सांगितले.
पुणे जिह्यात सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२७) रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स, व्हर्च्युअल मिटिंग पद्धतीने झाली. त्यावेळी ते बोलत होते. जवळपास ७०० सभासदांनी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स, व्हर्च्युअल मिटिंगमध्ये सहभाग घेतला. आर्थिक मंदी, नोटबंदी आणि त्यानंतर करोना काळात बँकेची प्रगती उल्लेखनीय आहे.कोरोनाच्या काळात ठेवी वाढल्या आहेत. बँकेने सहकार क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
बँकेच्या माध्यमातून इंटरनेट बॅंकिंग सुविधा लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य विमा बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. असे वाळुंज यांनी सांगितले.तसेच बँकेचे ३२ हजार ,८६४ सभासद असून १७ शाखांमधून जिल्ह्यातील मोठ्या शहरात कामकाज चालते.बँकेचा १७८.०६ कोटी रुपये स्वनिधी असुन १ हजार , १६९.९५ कोटीच्या ठेवी आहेत. बँकेने गतवर्षी ११.२९कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर सभासदाच्या वतीने महादेव घुले, अनंत भालेकर, संदिप बारणे गौतम कोतवाल आदींनी प्रश्न विचारले. त्यांचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळूंज, किरण आहेर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी उत्तरे देऊन केले. दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी बँकेच्या अहवालाचे वाचन केले.
यावेळी उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक प्रतापराव आहेर, किरण मांजरे,किरण आहेर,विजयाताई शिंदे, गणेश थिगळे मुकुंद आवटे,सतिशशेठ नाईकरे पाटील, राहुल तांबे पाटील, सागर पाटोळे, डी के गोरे,हेमलता टाकळकर, परेश खांगटे, धनंजय कहाणे,राजेंद्र सांडभोर,धर्मेंद्र खांडरे,किसन गारगोटे, सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे, व्यवस्थापक संजय ससाणे, दिलीप मलघे व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांकछ २७राजगुरुनगर बॅंक सभा
फोटो ओळ. : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या ८९ व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष राजेंद्र वाळुंज व संचालक मंडळ.