आजही शहरात १८८ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:52+5:302021-08-21T04:15:52+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या १८८ लसीकरण केंद्रांवर शनिवारी (दि. २१) प्रत्येकी २०० लसींचे डोस देण्यात येणार आहेत़, तर ससूनसह ...
पुणे : पुणे महापालिकेच्या १८८ लसीकरण केंद्रांवर शनिवारी (दि. २१) प्रत्येकी २०० लसींचे डोस देण्यात येणार आहेत़, तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ७ दवाखान्यांत प्रत्येकी ७०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़, तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२३ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
याचबरोबर कोव्हॅक्सिन लसीचे ३० टक्के डोस हे पहिला डोस म्हणून तर, ७० टक्के डोस हे २८ दिवस पूर्ण झालेल्या म्हणजेच ज्यांनी २४ जुलैपूर्वी पहिला डोस घेतला अशा नागरिकांना देण्यात येणार आहे़ यानंतरही लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ़ सूर्यकांत देवकर यांनी दिली.
लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.
--------------------