मंगळवारीही कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:43+5:302021-04-21T04:11:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सोमवारप्रमाणेच मंगळवारीही कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून आले असल्याचे दिलासादायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सोमवारप्रमाणेच मंगळवारीही कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून आले असल्याचे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळाले. मंगळवारी दिवसभरात ५ हजार १३८ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार ८०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात २० हजार २०४ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २५.४३ टक्के इतकी आहे.
दरम्यान आज दिवसभरात ७५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण पुण्याबाहेरील आहेत़. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ३४ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार २७७ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत १९ लाख २१ हजार ८२८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ७६ हजार ९६२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख १७ हजार ७६७ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही सद्य:स्थितीला ५२ हजार ९७७ इतकी झाली आहे. रविवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्या ही चार हजाराने कमी झाली आहे.
---------------------------------