बुधवारीही कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:37+5:302021-04-29T04:08:37+5:30
पुणे : शहरात बुधवारीही नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बुधवारी दिवसभरात ४ हजार ९३६ जण कोरोनामुक्त ...
पुणे : शहरात बुधवारीही नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बुधवारी दिवसभरात ४ हजार ९३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान शहरातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ४५ हजारच्या आत आली असून, सध्या शहरात ४४ हजार ५९ सक्रिय रुग्ण आहे.
गेल्या दहा दिवसांपासून शहरात दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात ३ हजार ९७८ नवे कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. आज २० हजार २७७ जणांनी तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोना बाधितांची टक्केवारी १९.६१ टक्के इतकी आहे. तर आज दिवसभरात ८५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २७ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ७१८ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३७९ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २० लाख ८७ हजार ९० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख १० हजार ५०४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ५९ हजार ७७९ कोरोनामुक्त झाले आहेत.
-----------