यंदाही शाळांची पहिली घंटा वाजलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:08+5:302021-06-16T04:13:08+5:30
कोरोनामुळे यंदाही शाळा ऑनलाइन सुरू ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाने केली होती. त्यानुसार मंगळवारपासून (दि. १५) शाळा सुरू झाली. कोरोना ...
कोरोनामुळे यंदाही शाळा ऑनलाइन सुरू ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाने केली होती. त्यानुसार मंगळवारपासून (दि. १५) शाळा सुरू झाली. कोरोना संकटातही शासनाच्या नियमानुसार पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रतिभा पवार विद्यामंदिरात नव्या शैक्षणिक वर्षानिमित्तचा प्रवेशोत्सव ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आनंदात साजरा झाला. हनुमाननगर, केळेवाडी, राऊतवाडी, सुतारदरा या परिसरातील इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या देवांश दहिभाते, श्लोक पडवळ, निनाद साठे, आयुष मुरमुरे, आरूश मोरे, रुद्र सपकाळ आदी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना दप्तर, पाठ्यपुस्तके, पेन्सील, रंगपेटी, फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ऑनलाईन शिक्षण असूनही शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थी व पालक यांचे चेहरे आनंदाने फुलले.
रंगीबेरंगी फुगे, रांगोळी काढून शालेय परिसर सुशोभित करून सर्व विद्यार्थ्यांचा ऑनलाईन तास घेऊन सरस्वती पूजन करण्यात आले. ऑनलाईन तासात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण शाळेचा परिसर दाखवून सरस्वती पूजन करण्यात आले. त्या वेळी मुख्याध्यापक शाम धुमाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.