स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील चौघांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:37 PM2021-08-14T21:37:15+5:302021-08-14T21:40:37+5:30

सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख, उपनिरीक्षक संतोष जाधव, विजय भोसले, पाॅल अँथोनी यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक

On the evening of Independence Day, four people from Pune police were honored with President's Police Medal | स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील चौघांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील चौघांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

Next

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, दौंड येथील पोलीस प्रशिक्षण कंद्रातील पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, शहर पोलीस दलातील विशेष शाखेतील सहायक पोलीस फौजदार विजय भोसले आणि पाॅल अंथोनी यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील मुळचे सुरेंदनाथ देशमुख यांचे शिक्षण पुण्यात झाले असून ते १९८५ मध्ये पोलीस सेवेत भरती झाले आहे. त्यांच्या आतापर्यंत मुंबई शहर,पुणे शहर, सांगली, पुणे ग्रामीण, औरंगाबाद शहर, नवी मुंबई या ठिकाणी नेमणूका झाल्या आहेत. मुंबईत नेमणूकीचा असताना सीएसटी स्थानकातून पळवून नेलेल्या ३ वर्षाच्या मुलीला उत्तराखंडातील हरिद्वार येथून आरोपीला ताब्यात घेऊन मुलीला सुखरुप पालकांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देशात सर्वप्रथम सीसीटीव्ही चा वापर राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला होता. जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २००९ या कालावधीत ट्रॉफीकाॅप हा पथदर्शी प्रकल्प पुण्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. त्याला डिसेंबर २०१० मध्ये भारत सरकारचा राष्ट्रीय स्तरावरचा बेस्ट प्राक्टिस इन पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी हा बहुमान मिळविला. तसेच डिसेंबर २०११ मध्ये केंद्रीय नगरी विकास मंत्रालयातर्फ दिला जाणारा न्यू इनिटेटिव्ह इन ट्रॉफिक इंजिनिअरींग ॲन्ड मॅनेजमेंट हा राष्ट्रीय पारितोषकाचा मान पटकाविला. नारायणगाव येथील हॉटेल कपिलाचे मालक चंद्रकांत खैरे यांचा खुन केलेल्या प्रमुख आरोपींपैकी निसार शेख याला अटक केली होती. चंद्रकांत खैरे यांचा मृतदेह मुळा नदीतून शोधून काढला होता. असे अनेक कौशल्यपूर्ण तपास देशमुख यांनी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेत केले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव हे मुळचे महाडमधील असून ते १९९० मध्ये राज्य राखीव पोलीस दल गट १ मध्ये भरती झाले. २००८ मध्ये बंगलोर व २०१२ मध्ये मध्य प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राला त्यांनी दोन वेळा पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात भाग घेणार्या महाराष्ट्र पोलीस संघास प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. लखनौ येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र संघास प्रथमच चॅम्पियनशिश ट्राॅफी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सहायक पोलीस फौजदार विजय भोसले हे १९८३ मध्ये पोलीस कॉन्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी आतापर्यंत स्वारगेट, वाहतूक, खडक व गुन्हे शाखेत काम केले आहे. त्यांना आतापर्यंत ३४९ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना २०१० मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे. २०१५ ते २०१९ या काळात ५५१ गुंडावर झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच विघातक व्यक्तीच्या कृत्यास आळा घालण्यासाठी त्यांनी प्रस्ताव तयार केले. पोलीस उपायुक्तांचे मदतनीस म्हणून या काळात ६० संघटीत गुन्हेगार टोळ्याविरुद्ध कारवाई करण्याकामी सिंहाचा वाटा घेतलेला आहे.

सहायक फौजदार पॉल अंथोनी हे जून १९८७ मध्ये पोलीस सेवेत भरती झाले आहेत. त्यांना आतापर्यंत ३१० बक्षिसे मिळाली आहेत.आपल्या ३४ वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी पोलीस मुख्यालय, डेक्कन,विमानतळ, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात काम केले असून सध्या ते विशेष शाखेत कार्यरत आहेत.

Web Title: On the evening of Independence Day, four people from Pune police were honored with President's Police Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.