पार्श्वनाथ जयंतीनिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:24+5:302021-01-08T04:35:24+5:30
पुणे : पार्श्वनाथ भगवान यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध जैन मंदिरं आणि स्थानकांमध्ये गुरुवारपासून तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात ...
पुणे : पार्श्वनाथ भगवान यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध जैन मंदिरं आणि स्थानकांमध्ये गुरुवारपासून तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७ ते ९ जानेवारी दरम्यान विशेष पूजा, भजन, तपश्चर्या अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीवर विशिष्ट वनौषधी मिश्रित दूध व पाणी यांनी अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी अनेक साधकांनी आठ्ठम उपवास (तीन दिवसीय उपवास) केले आहेत. या प्रसंगी लाभार्थी प्रमिलाबेन सुमतीलाल वखरचंद शहा, सुधीरभाई शहा, अशोकभाई शहा, चिराग दोशी, धीरूभाई शहा, राजीव शहा, चंपकभाई शहा आदी उपस्थित होते.
मूर्तीस अंगी तसेच मंदिरास सजावट करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जैन ॲलर्ट ग्रुपने केले. जगभरातील लाखो जैन अनुयायी हे पार्श्वनाथजयंतीला आठ्ठम उपवास करतात, असे ट्रस्टी राजीव शहा यांनी सांगितले.
...................
ओळ :
जेएमएडीट वर
छायाचित्र : अभिषेक करताना भाविक.