अखेर व्यापाऱ्यांच्या मागणीसमोर प्रशासन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:53+5:302021-06-30T04:08:53+5:30

-- माळेगाव : व्यापारी संघटनेच्या व्यथेपुढे नमते घेत प्रशासनाने माळेगावातील कन्टेन्मेंट झोनचे निर्बंध उठवून १ जुलै पासून सर्व व्यवहार ...

Eventually the administration succumbed to the demands of the traders | अखेर व्यापाऱ्यांच्या मागणीसमोर प्रशासन नमले

अखेर व्यापाऱ्यांच्या मागणीसमोर प्रशासन नमले

Next

--

माळेगाव : व्यापारी संघटनेच्या व्यथेपुढे नमते घेत प्रशासनाने माळेगावातील कन्टेन्मेंट झोनचे निर्बंध उठवून १ जुलै पासून सर्व व्यवहार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत व्यापारी संघटनेने केले आहे.

बारामती तालुक्यातील आठ गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ७ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारत सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेत १ जुलैपासून सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी जाहीर केले आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे विश्वास मांढरे, किरण शेंडे, सचिन जाधव, तौफिक आत्तार, रोहित घुसळकर, मुसा शेख, किरण गडकरी, योगेश लोणकर उपस्थित होते.

————————————————

फोटो ओळी- प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देताना व्यापारी संघटना.

२९०६२०२१-बारामती-१९

————————————————

Web Title: Eventually the administration succumbed to the demands of the traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.