अखेर एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 08:42 PM2020-12-23T20:42:11+5:302020-12-23T20:43:09+5:30

Elgar parishad : पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे.

Eventually the Elgar parishad was denied permission by the police | अखेर एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

अखेर एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

Next
ठळक मुद्देएल्गार परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगी मागणारा अर्ज आयोजकांनी केला होता. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पुणे : शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, एल्गार परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगी मागणारा अर्ज आयोजकांनी केला होता. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील लोक शासन आंदोलन या संस्थेही ही परवानगी मागितली होती.

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद : ३१ डिसेंबर रोजी आयोजन, पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज

तीन वर्षांपूर्वी शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेवरुन देशभर मोठा वादंग झाल्यानंतर आता पुन्हा पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येणार होते. त्यासाठी स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या वतीने परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता.  

Web Title: Eventually the Elgar parishad was denied permission by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.