अखेर कर्नवडी ग्रामस्थांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:13+5:302021-07-28T04:12:13+5:30
मार्गासनी : अखेर कर्नवडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले असुन येथील ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले असल्याची माहीती ...
मार्गासनी : अखेर कर्नवडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले असुन येथील ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी
शिंदे यांनी दिली. कर्नवडी ग्रामस्थ मोठ्या अनर्थापासुन बचावले आहेत.
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले कर्नवडी गावाच्या डोंगराच्या बाजुला
भेगा पडल्या आहेत. वेल्ह्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
मनोज पवार, गोपनीय विभागाचे अभय बर्गे,अजय साळुंखे केळदचे सरपंच रमेश शिंदे
यांनी शनिवारी (दि २४) कर्नवडी गावास भेट दिली होती.
येथील ग्रामस्थांना स्थलांतर होण्यासाठी सुचना दिल्या होत्या. परंतु येथील ग्रामस्थ
गाव सोडुन जाण्यास तयार होत नव्हते. परंतु २६ जुलै रोजी कर्नवडी गावच्या वरच्या बाजुला
असलेल्या सह्याद्रीच्या कड्यामध्ये रात्री १.३० सुमारास कड्याचा काही भाग कोसळल्याने मोठा
आवाज झाला रात्रीवेळी भर पावसात ग्रामस्थ घराच्या बाहेर पडले. यांची माहीती मिळताच
वेल्हे प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत त्याच दिवशी सह्याद्रीच्या कड्याकपारीत पायी चालत अधिकारी व कर्मचारी कर्नवडी येथे पोहचले. येथील लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. महाड येथील रानवडी येथे स्थलांतर करण्यासाठी मध्येच रस्ता खचला असल्याने याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने
भराव करण्यात आला. येथील ३२ कुटुंबांना रानवडी (ता. महाड) २ कुटुंबांना बिरवाडी (ता.महाड) एका
कुटुंबाला शिवथरघळ (ता.महाड) तर वेल्हे तालुक्यातील निगडे खुर्द आणि केळद येथे प्रत्येकी एक कुटुंब
असे एकुण ३७ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले.
चौकट
मढेघाट व सह्याद्रीचा उंच कडा पार करुन दऱ्या खोऱ्यातुन प्रशासकीय
अधिकारी व कर्मचारी कर्नवडी गावात पोहचले. यामध्ये तहसिलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार
सभापती दिनकर सरपाले, केळदचे सरपंच रमेश शिंदे, गोपनीय विभागाचे अभय बर्गे, अजय साळुंखे
विशाल मोरे, विजय गोहीणे, नाना राऊत, मंडल अधिकारी राजेंद्र लुणावत, तलाठी रविंद्र काळे, ग्रामसेवक शीरसागर,मंगेश शिंदे
आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : कर्नवडी ते रानवडी येथील खचलेल्या रस्त्याचा भराव प्रशासनाकडुन करण्यात आला. यावेळी तहसिलदार
शिवाजी शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, गटविकास अधिकारी विशाल शिंदे,सभापती दिनकर सरपाले.
२) रानवडी (ता.महाड) येथील जिल्हा परीषद शाळेत कर्नवडी येथील ३२ कुटुंबांना स्थलांतर करण्यात आके.