‘एव्हरेस्टवीर’ पोलीस दाम्पत्य निलंबित

By Admin | Published: November 18, 2016 06:31 AM2016-11-18T06:31:42+5:302016-11-18T06:31:42+5:30

‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ सर केल्याचा दावा करणाऱ्या पोलीस दाम्पत्याचा खोटेपणा उघड होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी

'Everestee' police couple suspended | ‘एव्हरेस्टवीर’ पोलीस दाम्पत्य निलंबित

‘एव्हरेस्टवीर’ पोलीस दाम्पत्य निलंबित

googlenewsNext

पुणे : ‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ सर केल्याचा दावा करणाऱ्या पोलीस दाम्पत्याचा खोटेपणा उघड होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दोघांनाही खात्यामधून निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी कायम ठेवली आहे. यापूर्वी नेपाळ सरकारने त्यांच्यावर दहा वर्षांची बंदी घातलेली आहे.
पोलीस शिपाई दिनेश चंद्रकांत राठोड आणि पोलीस नाईक तारकेश्वरी चंद्रकांत भालेराव (राठोड) अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस आहेत. दोघांचाही प्रेमविवाह झालेला असून, त्यांनी यापूर्वी आॅस्ट्रेलियामधील सर्वोच्च शिखर सर केल्याचाही दावा केला होता.
या दोघांनी एव्हरेस्ट मोहिमेमध्ये भाग घेत हे शिखर सर केल्याचा दावा केला होता. दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होताच आर. एक्स. कम्युनिकेशनच्या संचालिका अंजली शरद कुलकर्णी यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन दोघांच्या मोहिमेबाबत संशय व्यक्त केला होता. फोटो बनावट असल्याचे सांगितले होते. सहायक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये दोघांनी एव्हरेस्ट शिखर सर केले नसल्याचे समोर आले.

Web Title: 'Everestee' police couple suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.