झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:51 PM2020-04-27T14:51:54+5:302020-04-27T15:03:28+5:30

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

Every citizen will be tested in slums and crowded areas :Dr.Deepak Mhaisekar | झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

Next
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असणाऱ्यांवर अधिक लक्ष  तपासणीसाठी 350 स्वतंत्र पथके तयार 

पुणे : पुण्यात प्रामुख्याने झोपडपट्टी व गर्दी, दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने स्वतंत्र 350 पथके तयार केली आहेत. या पथकांच्या मार्फत कोरोना प्रभावित क्षेत्रात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असणाऱ्यांवर अधिक लक्ष वर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. 

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामध्ये देखील मध्यवस्तीत, झोपडपट्टीत आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करून देखील रूग्णांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. यामुळेच महापालिका प्रशासनाने या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील प्रत्येक घरा-घरांमध्ये जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. या भागात ज्येष्ठ नागरिक व ज्यांना इतर विकार आहेत जसे की, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अश्या वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत,त्या भागात 350 पथके पाठविण्यात येत आहे. या पथकाकडे पल्स ऑक्सिमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध विकार असलेल्या रुग्णांचा तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ऑक्सिजन सर्क्युलेशन लेव्हल, त्यांचे विकार नियंत्रणात आहेत की नाही, आणि त्यांना संभाव्य कोविड रोग होत असेल तर त्यांना वेगळे करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याबाबतची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. 
    पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत आपल्या घरातील ज्येष्ठ तसेच इतर काही विकार असणाऱ्या व्यक्तीला तपासून वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या घरात वेगळ्या रुममध्ये ठेवणे किंवा मनपाने सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोरोना या रोगावर मात करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. 60 ते 70 टक्के लोकांना हा रोग जीवघेणा ठरत नाही, मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या मोहिमेअंतर्गत त्यांची तपासणी करुन घ्यावी , असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

Web Title: Every citizen will be tested in slums and crowded areas :Dr.Deepak Mhaisekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.