प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 01:27 PM2019-12-21T13:27:25+5:302019-12-21T13:28:21+5:30

माझ्या करिअरमध्ये मी बरीच नाटके रिप्लेसमेंट म्हणून केली.

Every role i was accepted by 'Fresh' minded : Mohan Joshi | प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी 

प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी 

Next
ठळक मुद्देरस-भाव-रंजन नाट्यमहोत्सवाचे आयोजन

पुणे : नाट्यसृष्टीतील पदार्पण भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावरून झाले. माझ्या करिअरमध्ये मी बरीच नाटके रिप्लेसमेंट म्हणून केली. परंतु ज्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांच्या भूमिका वाट्याला आल्या. त्यांची कामे बघितली नसल्याने फ्रेश मनाने भूमिका साकारल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केली. 
शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आणि रोटरी इंडियाच्या शतकपूर्ती निमित्ताने रोटरी डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटी आणि भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्यावतीने दि. २२ डिसेंबरपर्यंत रस-भाव-रंजन नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविणाºया सुहासिनी देशपांडे, भारती गोसावी, रजनी भट, स्वरूपकुमार आणि राजन मोहाडीकर या कलाकारांचा सत्कार जोशी आणि भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी जोशी बोलत होते. रोटरीचे माजी प्रांतपाल विलास जगताप, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे कल्चरल संचालक संजय डोळे, भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे उपस्थित होते.
‘भरत’च्या आठवणी उलगडताना मोहन जोशी म्हणाले, की १९६८ मध्ये सहावीत असताना येथे आलो. तेव्हा जयंत तारे यांच्या ‘टूणटूण नगरी’चे प्रयोग सुरू होते. त्यावेळी राजन मोहाडीकर नाटकात काम करीत होते. पण त्यावेळी त्यांना प्रयोग करणे शक्य नसल्याने मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. आज ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मान आहे. 
मोहन जोशी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचा सत्कार केल्यानंतर गोसावी यांनी जोशी यांना स्टेजवर नमस्कार केला. हा नमस्कार तुम्हाला नसून, तुमच्यातील स्वामी समर्थांना असल्याची भावना व्यक्त केली. या अनपेक्षित कृतीने मोहन जोशी क्षणभर अवाक् झाले.
सुरुवातीस आनंद पानसे यांनी रस-भाव-रंजन नाट्यमहोत्सवाची माहिती दिली. ज्येष्ठ कलावंतांचा परिचय आणि सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. भरत नाट्यमंदिराचे विश्वस्त दीपक दंडवते आणि उपाध्यक्ष शिरीष फुले उपस्थित होते.

Web Title: Every role i was accepted by 'Fresh' minded : Mohan Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.