आरटीओतील प्रत्येक काम आता ‘अपॉईंटमेंट’ वर; शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 08:00 PM2020-06-17T20:00:25+5:302020-06-17T20:06:40+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद होते.
पुणे : लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज शुक्रवार (दि. १९)पासून सुरू होत आहे. मात्र, पक्का व शिकाऊ परवान्याप्रमाणे आता कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी आगाऊ वेळ (अपॉईंटमेंट) घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परवाना कोटाही जवळपास ८० ते ८५ टक्क्याने कमी करण्यात आलेला आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील परवाना, योग्यता प्रमाणपत्र, हस्तांतरण यांसह विविध नियमित कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी पुणे कार्यालयाने सर्वच कामांसाठी आगाऊ वेळ घेणे बंधनकारक केले आहे. वेळ घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. त्यानुसार आयडीटीआर, भोसरी, आळंदी रस्ता, दिवे व मुख्य कार्यालयांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. गरज भासल्यास व्हीआयपी कोट्याचा सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. शिबीर कार्यालयामध्ये मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. गुरूवार (दि. १८) पासून आॅनलाईन पध्दतीने आगाऊ वेळ घेता येईल. तर शुक्रवारपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. पुर्वी केवळ परवाना व योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण या सेवांसाठीच आॅनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागत होती.
----------------
आरटीओकडून दक्षता
- दोन अर्जदारांध्ये किमान ६ फुटांचे अंतर
- चाचणी झाल्यानंतर संगणक, की बोर्ड सॅनिटाईज करणार
- मास्क व हँडग्लोज बंधनकारक
- पक्क्या परवान्यासाठी वाहन सॅनिटाईज केलेले असावे
- ड्रायव्हिंग स्कुलचे वाहन प्रत्येक चाचणीवेळी सॅनिटाईज करणार
- योग्यता प्रमाणपत्रासाटी आलेले वाहनही सॅनिटाईज करणार
------------------
ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी संकेतस्थळ - www.rto.org.in/pune
--------------
वाहनविषयक कामांसाठी दैनंदिन अपॉईंटमेंट कोटा
ठिकाण कामाचे स्वरूप दैनंदिन कोटा
आयडीटीआर पक्का परवाना चाचणी ७५
(दुचाकी व चारचाकी एकत्र)
आळंदी रस्ता पक्का परवाना चाचणी
दुचाकी ७५
ऑटोरिक्षा २५
बॅज १०
दिवे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण
ऑटोरिक्षा २५
टुरिस्ट टॅक्सी २५
मालवाहू वाहने ४०
प्रवासी बस २०
मुख्यालय नवीन शिकाऊ परवाना ५०
चाचणीतून सुट असलेला परवाना ५०
परवानाविषयक नुतणीकरण ३०
दुय्यम प्रत ३०
नाव, पत्ता बदलणे १५
आयडीपी ०५
वाहनविषयक हस्तांतरण ३०
कर्जबोजा नोंद करणे २०
कर्जबोजा उतरविणे ३०
दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र २०
बीटी, फेरफार, आरएमए १०
नोंदणी नुतनीकरण ०५
नोंदणी रद्द करणे ५
ना हरकत प्रमाणपत्र ३०
पत्ता बदलणे १०