देशसेवा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 07:27 PM2019-06-07T19:27:21+5:302019-06-07T19:31:28+5:30

आम्ही एक हजारहून अधिक झाडे लावली आहेत. मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

Everybody should plant a tree as a national service: Shivshahir Babasaheb Purandare | देशसेवा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

देशसेवा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

googlenewsNext
ठळक मुद्देश्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे ‘माझा दवाखाना, माझं झाड’ अभियानपर्यावरणाचा प्राण असलेल्या झाडांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी डॉक्टरांनी घेतला पुढाकार

पुणे : आम्ही एक हजारहून अधिक झाडे लावली आहेत. मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ हवी. यंदाच्या वर्षी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाणार आहे. आपण प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे. देशसेवा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे आणि ते जगवले देखील पाहिजे, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. 
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझा दवाखाना, माझं झाड’ या अभियानाचा शुभारंभ पर्वती पायथा येथील बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानाबाहेर झाला. यावेळी डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, डॉ. सुनील जगताप, आयोजक प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. रवींद्र काटकर, डॉ. मंगेश खटावकर, डॉ.श्रीकांत बेलगमवाकर, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. सचिन पवार, डॉ. कुमार कोद्रे, विजय जोशी, डॉ. संगीता खेनट, आशिष जाधव, डॉ. शंतनु जगदाळे, सागर बारदेसकर, बालकलाकार श्रीश आणि दर्श खेडेकर आदी उपस्थित होते. 
प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ‘दवाखाना चालविणारकया प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यासमोर एक झाड लावून ते संपूर्णपणे वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, ही यामागील संकल्पना आहे. सध्या होणारा पर्यावरणाचा ऱ्हास दूर करत निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रातील ३ हजार डॉक्टर पुढाकार घेत आहेत. दवाखाना चालविणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यासमोर एक झाड लावून ते संपूर्णपणे वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, ही यामागील संकल्पना आहे. यादृष्टीने महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागांतील डॉक्टर्स यामध्ये सहभागी होणार आहेत.’ 
पर्यावरणाचा प्राण असलेल्या झाडांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यासमोरील जागा निवडून तेथे खड्डा व इतर व्यवस्था केल्यास संस्थेतर्फे त्यांना विनामूल्य झाडे पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील ३० वैद्यकीय संघटना या अभियानात सहभागी झाल्या आहेत. राज्यातील मोठी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांना देखील या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

Web Title: Everybody should plant a tree as a national service: Shivshahir Babasaheb Purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.