प्रत्येकाला अपमान, नकार पचविण्याची ताकद असलीच पाहिजे; प्रशांत दामलेंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 02:38 PM2023-06-28T14:38:11+5:302023-06-28T15:44:23+5:30

प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते. मात्र, परत परत एकच चूक होऊ नये, अशा मतांचा मी

Everyone must have the strength to digest insults rejections Opinion of Prashant Damle | प्रत्येकाला अपमान, नकार पचविण्याची ताकद असलीच पाहिजे; प्रशांत दामलेंचे मत

प्रत्येकाला अपमान, नकार पचविण्याची ताकद असलीच पाहिजे; प्रशांत दामलेंचे मत

googlenewsNext

पुणे : प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते. मात्र, परत परत एकच चूक होऊ नये, अशा मतांचा मी आहे. कुठलाही आणि कितीही मोठा कलाकार असाल तरी त्यांच्याकडे अपमान, नकार पचविण्याची ताकद असलीच पाहिजे. अपमान का झाला, हे समजून घेऊन काय करायचे नाही हे ठरविले की आपण योग्य दिशेने जातो, अशा भावना सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केल्या.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिराच्या ५५ व्या वर्धापनदिन सोहळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी थेट भेट या कार्यक्रमात सौमित्र पोटे यांनी प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दामले म्हणाले, छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते सुख असतं. आजपर्यंत माझे १२ हजार ७२३ प्रयोग झाले आहेत, त्यामध्ये फक्त दोन वेळा प्रयोग रद्द करावे लागले आणि तेही माझा आवाज बसल्यामुळे. माझ्या या प्रवासात माझे सहकारी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते. मला जे हवं होतं ते मिळत नाही, असे वाटल्याने एकवेळ थांबावं वाटलं होतं, पण विचार केला की, मी दुसरं करणार काय? निर्माता म्हणून माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे याचीही मला जाणीव झाली. यामुळे मी थांबण्याचा विचार मनातून काढून टाकला. आज मात्र निश्चयाने सांगतो की, जोपर्यंत माझे पाय चालतात, तोपर्यंत रंगभूमीची सेवा करणार.

नाट्यगृहांची दुरवस्था दूर करणार 

नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाविषयी बोलताना दामले म्हणाले, मी काही बदलायच्या भानगडीत पडत नाही. मी नव्याने करण्यावर विश्वास ठेवतो. आपले यशवंत नाट्य संकुल बंद होते, ते सुरू केले. नाट्यसंमेलन ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ती पार पडणारच. नवोदित कलाकारांना मुंबईत आसरा कसा द्यायचा, यावर प्राधान्यक्रमाने विचार करतोय. नाट्यगृहांची दुरवस्था दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नाट्य परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व ५८ शाखांचे ऑडिट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Everyone must have the strength to digest insults rejections Opinion of Prashant Damle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.