अग्निसुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:30+5:302021-02-12T04:11:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : ‘आग ही मानवी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. मात्र, आपले दुर्लक्ष, निष्काळजीपणा व अज्ञानामुळे ...

Everyone should be aware of fire safety | अग्निसुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक राहावे

अग्निसुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक राहावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : ‘आग ही मानवी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. मात्र, आपले दुर्लक्ष, निष्काळजीपणा व अज्ञानामुळे ती जीवघेणी ठरते. यामुळे अग्निसुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक राहायला हवे. अग्निशमनाची साधने व पूर्वतयारी ठेवली तर प्राणहानी व वित्तहानी टाळता येणे शक्य आहे,’ असे प्रतिपादन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन विभागाच्या एमआयडीसी स्टेशनचे अधिकारी एस. इंगावले यांनी केले.

एंजल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सेफ किइस फाउंडेशन, हनीवेल व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अग्निसुरक्षा प्रशिक्षण तसेच अग्निशमन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंगावले बोलत होते. यावेळी शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षेकेतर कर्मचारी यांनी अग्निसुरक्षा प्रशिक्षण घेतले.

सेफ किड्स फाउंडेशनच्या कार्यक्रम संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या, बालकांचे टाळता येणाऱ्या अपघातापासून संरक्षण करणे हे सेफ किड्स फाउंडेशनचे ध्येय आहे. या अनुषंगाने मागील पाच वर्षांत हनीवेलच्या सहयोगाने संस्थेमार्फत आजतागायत १० लाख १० हजार विद्यार्थी व पालकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. आगीच्या आपत्तीत प्राणहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. शाळासुद्धा यास अपवाद नाहीत. म्हणून शाळा व्यवस्थापनाने शाळेत आगीस प्रतिबंध करण्याची खबरदारी व आपत्तीसाठी पूर्वतयारी ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने व राज्य तथा केंद्र शासनाने वेळोवेळी सूचित केलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन विभागाचे सब फायर ऑफिसर विजय महाजन, एंजल हायस्कूलच्या प्राचार्या शमशाद कोतवाल, मुख्य व्यवस्थापिका त्रिवेणी घाटे, एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका खुशबू सिंग उपस्थित होते. मिलिंद गुडदे यांनी सूत्रसंचालन केले तर एंजल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अनंत कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: Everyone should be aware of fire safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.