अभियांत्रिकी दृष्टिकोनातून प्रत्येकाने उपायकारक बनावे - डॉ. दीपक शिकारपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:59+5:302021-09-23T04:13:59+5:30
भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिवसाचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्यावतीने ‘सूर्यदत्ता विश्वेश्वरय्या ...
भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिवसाचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्यावतीने ‘सूर्यदत्ता विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग एक्सलन्स अवार्ड-२०२१’च्या वितरणप्रसंगी डॉ. शिकारपूर बोलत होते. बांधकाम व्यावसायिक सुहास लुंकड, सीओईपी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष, उद्योजक भरत गीते, उद्योजक नितीन नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
बावधन येथील सूर्यदत्ताच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी विश्वेश्वरय्या सभागृहाचेही उद्घाटन झाले. प्रसंगी आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सचिन ईटकर, ‘सूर्यदत्ता’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. १५० पेक्षा अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
फोटो - सूर्यदत्ता