प्रत्येकाने एक झाड लावून जगवावे : डाॅ. त्रिभुवन कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:09+5:302021-06-19T04:08:09+5:30

गराडे : भविष्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये. माणसाला पुरेशा आॅक्सिजन मिळावा. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून ते ...

Everyone should plant a tree and live: Dr. Tribhuvan Kulkarni | प्रत्येकाने एक झाड लावून जगवावे : डाॅ. त्रिभुवन कुलकर्णी

प्रत्येकाने एक झाड लावून जगवावे : डाॅ. त्रिभुवन कुलकर्णी

googlenewsNext

गराडे : भविष्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये. माणसाला पुरेशा आॅक्सिजन मिळावा. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून ते वाढवावे, असे आवाहन पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिभुवन कुलकर्णी यांनी केले

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात दिवे (ता. पुरंदर) येथील शासकीय धान्य गोदाम आवारामध्ये डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रंजना उंबर-हांडे, तहसीलदार रूपाली सरनोबत, नायब तहसीलदार संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अव्वल कारकून चंद्रशेखर दगडे, पुरंदरचे पुरवठा निरीक्षक सुधीर बडदे, मंडल अधिकारी राजाराम भामे, तलाठी गणपत खोत, स्नेहा कांबळे, सुधीर गिरमे, अक्षय कोरपड, रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी महेश जगताप, अशोक दळवी, रवींद्र ताकवले, तुकाराम पोमण, संघटना अध्यक्ष यशवंत भांडवलकर राधिका पवार आदी मान्यवर उपस्थित होते

धान्य गोदामाची स्वच्छता व टापटीपपणा पाहून त्यांनी पुरवठा विभागाचे कौतुक केले. पुणे विभागात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून औदुंबर, पिंपळ, वड, जांभुळ, आंबा, चिंच, आवळा,करंज आदी झाडे लावली जाणार असल्याचे डाॅ. त्रिभुवन कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रास्तविक पुरंदरचे पुरवठा निरीक्षक सुधीर बडदे यांनी केले. आभार राजाराम भामे यांनी मानले.

दिवे (ता. पुरंदर) येथे वृक्षारोपण करीत असताना डाॅ. त्रिभुवन कुलकर्णी समवेत प्रमोद गायकवाड, रंजना हांडे, रुपाली सरनोबत, संतोष सरडे, सुधीर बडदे व इतर मान्यवर.

Web Title: Everyone should plant a tree and live: Dr. Tribhuvan Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.